रेसर बाईकचा स्पीड दोघांच्या जिवावर बेतला, महामार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटले अन्…

दोघे मित्र स्पोर्ट्स बाईक घेऊन एकत्र फिरायला घरुन निघाले. पण इच्छित स्थळी पोहचण्याआधीच तरुणांवर काळाने घाला घातला आणि फिरायला जाण्याची इच्छा अधुरीच राहिली.

रेसर बाईकचा स्पीड दोघांच्या जिवावर बेतला, महामार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटले अन्...
चंद्रपूरमध्ये बाईक अपघातात दोन मित्रांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 1:14 PM

चंद्रपूर / निलेश डहाट : भरधाव वेगात स्पोर्ट्स बाईकवरुन फिरायला जात असताना महामार्गावर बाईकवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दोघे तरुण मित्र होते. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा फाट्याजवळील नागपूर-चंद्रपूर महामार्गावर ही घटना घडली. दोघेही तरुण वरोरा शहरातील रहिवासी आहेत. हर्षल पाचभाई आणि अंकुश भडगरे अशी मयत तरुणांची नावे आहेत. भद्रावतीला जात असताना पोलिसांच्या महामार्गावरील बॅरिकेटला बाईकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला.

एक पॉलिटेक्निकचा विद्यार्थी तर दुसरा व्यावसायिक

हर्षल पाचभाई हा पॉलिटेक्निक द्वितीय वर्षात परतवाडा येथे शिकत होता. तर अंकुश स्वतःचा तेलघाणी आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करीत होता. अंकुश आणि हर्ष बीएमडब्ल्यू जी 310 आरआर बाईकवरून प्रवास करत होते. ही बाईक अंकुश याच्या मालकीची असून, या बाईकची किंमत 3 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.

अपघातात एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचा रुग्णालात नेत असताना मृत्यू

दोघे मित्र आपली रेसर बाईक घेऊन वरोऱ्याहून भद्रावतीकडे फिरण्यासाठी भरधाव निघाले. अचानक मानोरा फाट्याजवळ दुचाकीलरील नियंत्रण सुटले. यानंतर अनियंत्रित बाईक महामार्गावरील बॅरिकेटवर आदळली. दोन्ही तरुणांनी बाईक चालवताना डोक्यात हेलमेट घातले नव्हते. भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याचा उपचारार्थ नेत असताना मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

भरधाव कार शेतात आदळून दोघे जखमी

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर येथे पूर्णा-नांदेड महामार्गावर वेगात जाणाऱ्या चार चाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन आदळली. कारमध्ये बसलेले पूर्णा येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि एक सरपंच हे दोघे अपघातात गंभीर झाले आहे.

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.