Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Crime : सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर

गस्तीला ताकारी येथे गेलेले पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करून शोध सुरू केला. तर इस्लामपूर शहर हद्दीत बोरगाव ते जुनेखेड जाणाऱ्या रोडवर जुनेखेड गावच्या दिशेने एक भरधाव वेगाने ट्रॅक्‍टर गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी लागलीच सदरच्या ट्रॅक्टरचा चित्तथरारक पाठलाग करून सदर ट्रॅक्टर थांबवला.

Sangli Crime : सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर
सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 6:23 PM

सांगली : सांगलीच्या इस्लामपूर पोलीस स्टेशनच पोलीस रात्री गस्तीला असणाऱ्या पथकाच्या सतर्कतेमुळे अवघ्या एका तासात ट्रॅक्टरसह चोरट्यास जेरबंद (Arrest) करण्यात आले आहे. सदरच्या ट्रॅक्टरचा चित्तथरारक पाठलाग करून पोलिसांनी हा ट्रॅक्टर (Tractor) पकडला आहे. अक्षय अशोक गोरवे (26) असे ट्रॅक्टर चोरणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता ट्रॅक्टर चोरुन आणल्याची त्याने कबुली दिली. पोलिस अधिक्षक दिक्षित कुमार गेडाम साहेब, अपर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले मॅडम यांनी चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे इस्लामपूर पोलिसांनी रात्र गस्तीला हत्यारबंद पोलिस पथके नेमली आहेत. (Accused arrested for tractor stolen in Sangli)

गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाठलाग करुन ट्रॅक्टर पकडला

इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीत रात्रगस्त करताना पहाटे 2 वाजता ताकारी गावात फिर्यादी अभिजीत चंद्रकांत मोरे राहणार रेठरेहरणाक्ष यांच्या ताकारी गावातील मित्राच्या पत्र्याचे शेडमध्ये 80 हजार रुपये किमतीचा एक पावर ट्रक कंपनीचा निळा रंगाचा ट्रॅक्टर हा त्यांनी एक तासापूर्वी लावलेला होता. तरी तो दिसून येत नसल्याने चोरीस गेला असल्याबाबत रात्री पोलिसांना सांगितले. गस्तीला ताकारी येथे गेलेले पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करून शोध सुरू केला. तर इस्लामपूर शहर हद्दीत बोरगाव ते जुनेखेड जाणाऱ्या रोडवर जुनेखेड गावच्या दिशेने एक भरधाव वेगाने ट्रॅक्‍टर गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी लागलीच सदरच्या ट्रॅक्टरचा चित्तथरारक पाठलाग करून सदर ट्रॅक्टर थांबवला. सदर ट्रॅक्टरबाबत विचारणा केली असता त्याने ट्रॅक्टर चोरून आणल्याची कबुली दिली.

लासलगाव बाजार समितीतून शेतकऱ्याचा कांद्याचा ट्रॅक्टर चोरी

लासलगाव बाजार समितीत दररोज दीड ते दोन हजार ट्रॅक्टर पिकअप वाहनातून कांदा विक्रीला येत असतो. अशाच पद्धतीने निफाड तालुक्यातील लासलगाव जवळ असलेल्या टाकळी विंचूर येथील कांदा उत्पादक शेतकरी सुरेश बाबाजी काळे यांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली लिलावासाठी आणली होती. काळे हे जेवणासाठी घरी गेले असता त्याच दरम्यान अज्ञात चोरट्याने कांद्याने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली आहे. (Accused arrested for tractor stolen in Sangli)

इतर बातम्या

Video: हा स्फोट युक्रेनमधील नाही, तर Pune जिल्ह्यातील कात्रजमधला! एकपाठोपाठ एक सिलिंडर स्फोट

Nagpur Dogs | रामटेकमध्ये कुत्र्यांचा मुलीवर प्राणघातक हल्ला, 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी

कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.