Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला तेलंगणातून अटक

मोबाईल लोकेशननुसार आरोपी तेलंगणा राज्यात असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी तेलंगणातून आरोपीची गठडी वळली. सदर आरोपी वसई येथे रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर स्टँड बॉय म्हणून कामाला होता.

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला तेलंगणातून अटक
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला तेलंगणातून अटक
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 3:59 PM

वसई : लग्नाचे आमिष दाखून 21 वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वसई लोहमार्ग पोलिसांनी तेलंगणातून मुसक्या आवळल्या आहेत. शेष प्रसाद ऊर्फ दिपू हिरालाल पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध 26 जुलै 2021 रोजी लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. (Accused of sexually abusing a girl arrested in Telangana)

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा मोबाईल फोन ट्रेस केला. मोबाईल लोकेशननुसार आरोपी तेलंगणा राज्यात असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी तेलंगणातून आरोपीची गठडी वळली. सदर आरोपी वसई येथे रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर स्टँड बॉय म्हणून कामाला होता. त्यावेळी आरोपीने हे दुष्कृत्य केले असल्याचे पोलीस तपासाच समोर आले. वसई लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 323, 376(2)(एन), 354,अ(1)(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने याआधी देखील असे कृत्य केले आहे का? याचा सखोल तपास वसई लोहमार्ग पोलीस करत आहेत.

सोलापुरात महिलेची हत्या करुन मृतदेह झुडपात फेकला

सोलापूरमध्ये 40 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन दिवसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आला. मुलानेच महिलेची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्या केल्यानंतर महिलेचा मृतदेह झुडपात टाकून दिला होता. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात ही घटना घडली. रुक्मिणी फावडे असे खून झालेल्या 40 वर्षीय महिलेचे नाव आहे. दरम्यान, घरातील महिलेचा मुलगा गायब झाल्याने मुलानेच खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तीन दिवसापासून महिलेच्या घराला कुलूप आहे. तीन दिवसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आला.

नागपुरात भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून घरमालकाचा गळफास

दुसरीकडे, भाडेकरुच्या धमक्यांना त्रासून घर मालकाने गळफास घेतला. नागपूरमधील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत आत्महत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी घरमालकाने व्हिडीओ तयार केला होता. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला.

नाशकात तरुणाच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला

अंबड पोलिसांनी हत्येचा कट उधळत तडिपार गुंडासह 5 जणांना बेड्या ठोकल्या. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन नाशकातील तरुणाला जीवे ठार मारण्याचा कट होता. मात्र पोलिसांनी पाच आरोपींना वेळीच अटक करत शस्त्रही जप्त केली. नाशिकमधील अंबड पोलिसांनी हत्येचा कट उधळून लावला. गावठी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसे आणि कोयते जप्त करण्यात आले आहेत. पकडलेल्या संशयित आरोपींपैकी एकाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा कट होता.

तडीपार गुंड निखिल बेग याच्यासह ज्ञानेश्वर लोहकरे, रोशन सूर्यवंशी, विशाल अडांगळे आणि सनी गायकवाड अशा पाच जणांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तडीपार गुंड सर्रासपणे नाशिक शहरात वावरत असल्याचं या घटनेमुळे उघडकीस आलं आहे. (Accused of sexually abusing a girl arrested in Telangana)

इतर बातम्या

काय सांगता ? जनावरांसाठीही आता चॉकलेट कॅंडी, पोषण आहार अन् सर्वकाही

सिन्नर, निफाडमध्ये कोरोना रुग्णसंख्या तीन आकडी; येवल्यातही 76 जणांवर उपचार सुरू

कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, सर्व शो बंद; प्रकरण काय?
कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, सर्व शो बंद; प्रकरण काय?.
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.