अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अपहरण केल्याप्रकरणी आरोपीला चार वर्षाचा कारावास

शोध पथकाने कर्नाटकातील मांगूर या गावातून या प्रकरणातील अपहृत अल्पवयीन मुलगी व संशयित दोघा आरोपींचा ताबा घेतला होता. तसेच शिवाजीनगर पोलीस पथकाने संशयित आरोपी सुमैय्या शेख व तिचा पती अशा दोघांना अटक केली होती.

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अपहरण केल्याप्रकरणी आरोपीला चार वर्षाचा कारावास
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 10:11 PM

इचलकरंजी : इचलकरंजी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला लग्नाचे आमिष दाखवल्याप्रकरणी आरोपी महिलेला न्यायालयाने 4 वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सुमैय्या अमीर शेख असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. इचलकरंजी येथील अप्पर सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्यावरील सुनावणी आता बाल न्यायालयात होणार असल्याचे सांगण्यात आले.

2016 मध्ये झाले होते अपहरण

इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 8 जानेवारी 2016 रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सदर पोलीस ठाण्यात सुमैय्या अमीर शेख व तिचा पती अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल माळी व त्यांच्या पथकाने अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी सर्वत्र तपास यंत्रणा कार्यरत ठेवली होती. याच दरम्यान सदर शोध पथकाने कर्नाटकातील मांगूर या गावातून या प्रकरणातील अपहृत अल्पवयीन मुलगी व संशयित दोघा आरोपींचा ताबा घेतला होता. तसेच शिवाजीनगर पोलीस पथकाने संशयित आरोपी सुमैय्या शेख व तिचा पती अशा दोघांना अटक केली होती.

आरोपीला चार वर्षाचा सश्रम कारावास

यानंतर तत्कालीन डीवायएसपी विनायक नरळे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. तसेच दोघा संशयित आरोपींविरुद्ध इचलकरंजी अप्पर सत्र न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सदर पिडीत अल्पवयीन मुलीने आपल्या जबाबात या प्रकरणातील संशयित आरोपी सुमैय्या शेख हिने आपल्याला तिच्या पतीशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवल्याचे कबूल केले होते.

या प्रकरणातील सुनावणीमध्ये साक्षीदारांचे म्हणणे ग्राह्य धरुन संशयित आरोपी सुमैय्या शेख या महिला आरोपीस चार वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा अप्पर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.बी. शेळके यांनी सुनावली. दरम्यान या सुनावणी दरम्यान या प्रकरणातील आणखी एका संशयित आरोपीने आपण अल्पवयीन असल्याचे पुराव्यानिशी न्यायालयात सिध्द केले होते. त्यामुळे त्याची स्वतंत्र सुनावणी आता बाल न्यायालयासमोर होणार असल्याचे सांगण्यात आले. (Accused sentenced to four years in prison for kidnapping a minor girl on the pretext of marriage)

इतर बातम्या

अल्पवयीन भावा-बहिणीचा लैंगिक छळ, प्रियकर-प्रेयसीच्या विकृत चाळ्यांनी कल्याण हादरले

विवाहित मैत्रिणीची अन्य पुरुषांशी मैत्री खटकली, बलात्काराचा प्रयत्न, नंतर कात्रीने गळ्यावर वार करुन हत्या

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.