दिवसभर फिरुन बेड मिळेना, हतबल नातेवाईकांनी अॅम्ब्युलन्स थेट जिल्हाधिकारी कार्यलयात घुसवली!

बेड मिळत नसल्याने दिवसभर सैरावैरा फिरल्यानंतर, अॅम्ब्युलन्स थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आली.

दिवसभर फिरुन बेड मिळेना, हतबल नातेवाईकांनी अॅम्ब्युलन्स थेट जिल्हाधिकारी कार्यलयात घुसवली!
Buldhana Ambulance in collector office
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 6:48 PM

बुलडाणा : बेड मिळत नसल्याने दिवसभर सैरावैरा फिरल्यानंतर, अॅम्ब्युलन्स थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आली. रुग्णाचे नातेवाईक यांची हतबलता आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या आक्रमकतेमुळे, रुग्णाला ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) उपलब्ध झाला. बुलडाण्यात हा प्रकार घडला. (After not getting Oxygen Bed, the helpless relatives rushed the ambulance to the Buldhana Collector office Maharashtra )

औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथील अनुसयाबाई गवार या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना आज बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्याठिकाणी रॅपिड टेस्ट केली, मात्र ती निगेटिव्ह आली. त्यांना न्यूमोनिया असल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे त्याठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने त्यांना बुलडाणा येथे पाठवले.

दिवसभर फिरुनही बेड नाही

मात्र दिवसभर फिरुनही कुठेही त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हता. सकाळी 11 पासून अॅम्ब्युलन्स त्यांना घेऊन शहरभर फिरत होती. संध्याकाळी साडेचारपर्यंत शहरातील 7-8 रुग्णालयं पालथी घातली. मात्र त्यांना ऑक्सिजन बेड मिळाला नाही.

Buldhana Ambulance in collector office

Buldhana Ambulance in collector office

शेवटी त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अॅम्बुलन्स थेट बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नेली. यावेळी प्रशासनात एकच खळबळ उडाली. ही बाब स्वाभिमानीच्या रवीकांत तुपकर यांना कळताच त्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णाला ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला.

ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल

विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही एक्स्प्रेस नागपुरात दाखल झाली. सातपैकी तीन ऑक्सिजन टँकर नागपूरमध्ये उतरविले जाणार आहेत. त्यानंतर ही एक्स्प्रेस नाशिककडे निघणार आहे. यामुळे नागपूर आणि विदर्भातील ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातील ही पहिली ऑक्सिजन ट्रेन आहे.

संबंधित बातम्या 

मोठी बातमी ! देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.