त्याने जीवाची बाजी लावून तिघांना वाचवलं, शेवटी शरीरातील त्राण गेला अन् प्राण सोडला, तरुणाच्या मृत्यूमुळे नगर हळहळलं

पाण्यात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आल्यानंतर शेवटी थकून गेल्यामुळे एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

त्याने जीवाची बाजी लावून तिघांना वाचवलं, शेवटी शरीरातील त्राण गेला अन् प्राण सोडला, तरुणाच्या मृत्यूमुळे नगर हळहळलं
AHMEDNAGAR YOUNG BOY DROWNED
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 7:45 PM

अहमदनगर : पाण्यात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आल्यानंतर शेवटी थकून गेल्यामुळे एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अहमदनगर शहरातील धबधब्यावर हा दुर्दैवी प्रकार घडला. मयूर परदेशी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तिघांना जिवदान देणाऱ्या या तरुणाचा दम लागून शेवटी मृत्यू झाल्यामुळे अहमदनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. (After rescuing Three drowning man young boy died in Ahmednagar)

कशाचाही विचार न करता त्याने धबधब्यात उडी घेतली, तिघांना वाचवलं

मिळालेल्या माहितीनुसार नगर शहरातील काही युवक धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी हे तिघेही पाण्यात पोहत होते. मात्र, पोहत असताना या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. हे तिघेही धबधब्यात बुडत होते. हा सर्व प्रकार यावेळी मयूर परदेशी या तरुणाने पाहिला. कशाचाही विचार न करता त्याने धबधब्यात उडी घेतली आणी एकएक करुन तिघांनाही पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, पाण्याच्या प्रवाहातून तिघांनाही बाहेर काढत असताना मयूर परदेशी थकला. शरीरातील त्राण गेल्यामुळे शेवटी धबधब्याच्या काठावर येईपर्यंत परदेशी याला धाप लागली. यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पोहून थकल्यामुळे शेवटी पाण्यात बुडाला

तिघांना वाचवणारा हा तरुण बुडत असताना त्याला सर्वजण पाहत होते. तरुणाला बुडताना पाहून इतरांनी आरडाओरड केली. त्यानंतर काही युवाकांनी मदतीसाठी धबधब्यात उडीदेखील घेतली. मात्र तोपर्यंत परदेशी पाण्यात बुडाला होता. त्याला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अहमदनगरमध्ये शोककळा

दरम्यान, स्वत: बलिदान देत तिघांना जीवदान देणाऱ्या या तरुणासोबत घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तिघांना वाचवण्यासाठी त्याने दाखवलेल्या हिमतीचेही अनेकांनी स्वागत केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या :

Monsoon Alert : पुढचे 5 ते 6 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पावसाचा जोर वाढण्याचा IMDचा अंदाज

Mumbai Rains Live Updates | शहापूरमधील भातसा नदीच्या पाणी पातळीत वाढ

ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅक्शन मोडवर, कंबरभर पाण्यातून वाट कढत तोडली संरक्षक भिंत; पूरस्थिती टळली

(After rescuing Three drowning man young boy died in Ahmednagar)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.