तरालूतील प्रशिक्षण शाळेत जन्म, स्फोटकं शोधून हल्ला करण्यात माहीर, अखेर प्राणज्योत मालवली
एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मदत करतात. पण, ते जातात तेव्हा सर्व कर्माचाऱ्यांना विशेषता त्यांच्या प्रशिक्षकांना चटका लावून जातात.
व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : पोलीस दलात काही श्वास कार्यरत असतात. त्यांची मदत चोराचा शोध घेण्यासाठी होतो. श्वानांचे नाक तीक्ष्ण असते. त्यांना प्रशिक्षित केल्यास ते आरोपीचा पाठलाग करतात. एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मदत करतात. पण, ते जातात तेव्हा सर्व कर्माचाऱ्यांना विशेषता त्यांच्या प्रशिक्षकांना चटका लावून जातात. श्वान वेन्सचा जन्म १४ नोव्हेंबर २०१९ रोजी डीबीटीएस (डॉग ब्रिडींग अँड ट्रेनिंग स्कूल) तरालू येथे झाला. तेथे त्याचे दोन हँडलर कॉन्स्टेबल/जीडी अभिजित चौधरी आणि कॉन्स्टेबल/जीडी शुभजित गराई यांच्यासोबत प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान वेन्सने सर्वोत्कृष्ट श्वानाचा किताब पटकावला.
वेन्स नक्षलविरोधी कारवायांसाठी तैनात
अहेरी येथील ३७ बटालियन, सीआरपीएफचा श्वान वेन्स (VENCE) याचे ४ जून रोजी सायंकाळी ७:२० वाजता निधन झाले. ही घटना भामरागड तालुक्यातील कोठी येथे घडली. वेन्स अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त कोठीमध्ये नक्षलविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आले होते.
वेन्स हल्ला करण्यात माहीर
१३ एप्रिल २०२१ पासून वेन्सची ३७ बटालियनमध्ये नियुक्ती करण्यात आली. अत्यंत संवेदनशील नक्षलग्रस्त भागात नक्षलविरोधी ऑपरेशनमध्ये भाग घेतला. पोलीस दलाला आई. ई.डी., ॲम्बुश इत्यादीच्या नुकसानीपासून वाचवले. वेन्स स्फोटक शोधून, आई.पी. (इन्फन्ट्री पेट्रोल) आणि हल्ला करण्यात माहीर होता.
जवानांनी वेन्सला अर्पित केली श्रद्धांजली
वेन्सच्या जाण्याने पोलीस दलाला मोठा फटका बसला आहे. अशा शूर श्वानाचा सन्मान करण्यासाठी सीआरपीएफ ३७ बटालीयनचे कमांडंट एम.एच. खोब्रागडे, ९ बटालियनचे कमांडंट आर.एस. बालापूरकर आणि ३७ आणि ९ बटालीयनचे सर्व अधिकारी, अधिनस्थ अधिकारी उपस्थित होते. सर्व जवानांद्वारे वेन्सला श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. साश्रृ नयनांनी वेन्सला अखेरचा निरोप देण्यात आला.