Ahmednagar Hospital Fire Live : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेची पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी केली जाणार

| Updated on: Nov 07, 2021 | 1:12 AM

Ahmednagar Hospital Fire Live : अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना समोर आलीय. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय, अशी माहिती अहगमदगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Ahmednagar Hospital Fire Live : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेची पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी केली जाणार
अहमदगरमध्ये शासकीय रुग्णालयाला आग, 11 जणांचा मृत्यू

अहमदनगर: राज्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना समोर आलीय. आगीच्या घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 11 झाला आहे. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

पाच जणांचा मृत्यू आणखी काही जण भाजल्याची शक्यता

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्यानं 10  जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आगीत काही रुग्ण भाजल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. रुग्णालयात अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

10 जणांचा मृत्यू

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रुग्णालयाला लागलेल्या आगीत अनेक जण भाजले असल्याची शक्यता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. रुग्णालयाच्या तळमजल्यावर आग लागली.

आग कशामुळं लागली याचं कारण अस्पष्ट

जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.यानिमित्त शासकीय रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा मुद्दा निर्माण झालाय.

 20 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं

जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. आयसीआयूला लागलेल्या आगीत 12 ते 15 जण जखमी झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांनी दिली आहे.

हसन मुश्रीफ तातडीनं अहमदनगरकडे निघणार

अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10  जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीनं कोल्हापूरहून नगरकडे निघणार आहेत.

आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने अहमदनगरच्या दिशेने निघाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ माहिती यांनी दिली आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईक यांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या: 

Raj Thackeray’s New House Photo | राज ठाकरेंचा गृहप्रवेश ; पाहा ‘शिवतीर्थ’ चे आकर्षक फोटो

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील हाचर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड; मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोप

किरण गोसावी हाच राष्ट्रवादीच्या सुनील पाटीलचा पंटर, मोहित कंबोज यांचा मोठा गौप्यस्फोट; ड्रग्जप्रकरणात ट्विस्ट?

Ahmednagar District Civil Hospital Fire broke out live update at icu six people died many injured in fire

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Nov 2021 08:55 PM (IST)

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेची पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी केली जाणार

    अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेची पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी केली जाणार

    तर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करणार

    आयजी दीपक पांडे यांची माहिती

  • 06 Nov 2021 05:06 PM (IST)

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची आमदार रोहित पवारांनी केली पाहणी

    अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची आमदार रोहित पवारांनी केली पाहणी

    या घटनेची चौकशी करण्याची मागणी

    तर पीएम फंडातून हे व्हेंटिलेटर आले

    अशी घटना घडायला नको होती

  • 06 Nov 2021 04:39 PM (IST)

    बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री बाईट

    ही घटना दुर्दैवी असून दोषींवर करावी केली जाईल

    तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख मद्दत

    आगीत झालेल्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती

    तर घटनेची सखोल चौकशी केली जाईल

  • 06 Nov 2021 04:38 PM (IST)

    जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी आ.राधाकृष्ण विखे पाटिल यांची प्रतिक्रिया

    निष्पाप लोकांचा बळी… प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा परिणाम… आयसीयूत रुपांतर केलेले सेंटर , फायर ऑडीट झाले नसल्याची माहीती… जिल्हयात तीन मंत्री मात्र कोविड काळात रुग्ण वा-यावर … मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मात्र यापूर्वी  आदेश दिले पन ते भासणात… घटनेच राजकारण करणार नाही मात्र ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा ‌दाखल करावा…
  • 06 Nov 2021 04:34 PM (IST)

    अहमदनगर रुग्णालय आग प्रकरण, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा ‌दाखल करा- राधाकृष्ण विखे पाटील

    अहमदनगर : जिल्हा रुग्णालय आग प्रकरण भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

    निष्पाप लोकांचा बळी गेला

    प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा हा परिणाम

    आयसीयूत रुपांतर केलेले सेंटर, फायर ऑडीट झाले नसल्याची माहीती

    जिल्हयात तीन मंत्री, मात्र कोविड काळात रुग्ण वाऱ्यावर

    मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मात्र यापूर्वी आदेश दिले पण ते भाषणात दिले.

    घटनेचं राजकारण करणार नाही मात्र ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा ‌दाखल करावा

  • 06 Nov 2021 04:15 PM (IST)

    घटना दुर्दैवी असून दोषींवर कारवाई केली जाईल- बाळासाहेब थोरात

    अहमदनगर : ही घटना दुर्दैवी असून दोषींवर कारवाई केली जाईल- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

    मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत

    आगीत झालेल्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती

    तर घटनेची सखोल चौकशी केली जाईल

  • 06 Nov 2021 04:08 PM (IST)

    नगर आग प्रकरणी सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया

    अहमदनगरला जिल्हा रुग्णालयात आयसीयू विभागाला लागलेलली आग अतिशय दुर्दैवी घटना घडली असून दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा खासदार सुजय विखे यांनी दिला आहे. तसेच जखमींवर उपचार सुरू असून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय.
  • 06 Nov 2021 03:53 PM (IST)

    नगरच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • 06 Nov 2021 03:52 PM (IST)

    महसूलमंत्री बाबासाहेब थोरात घटनास्थळी दाखल

    अहमदनगर

    जिल्हा रुग्णालयात लागलेल आग प्रकरण

    महसूलमंत्री बाबासाहेब थोरात घटनास्थळी दाखल

    घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी थोरात जिल्हा रुग्णालयात दाखल

    थोरतांच्या उपस्थितीत बैठक सुरू,

    जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी उपस्थित

  • 06 Nov 2021 03:30 PM (IST)

    खासदार  सदाशिव लोखंडे बाईट

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयात विभागाला लागलेल्या आगी प्रकरणी शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाहणी करून अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे तर त्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यासाठी मागणी केली असून मुख्यमंत्री देखील याला सकारात्मक आहेत असं लोखंडे यांनी म्हटले आहे.

  • 06 Nov 2021 03:29 PM (IST)

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

    मुंबई : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

    आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत

  • 06 Nov 2021 03:27 PM (IST)

    नवाब मलिक बाईट

    नगर दुर्घटनेबाबत चौकशी होईल सुरक्षा यंत्रणा होती का फायर ऑडिट झालं होत का याबाबत चौकशी होईल कोणी दोषी असेल कारवाई होईल यातील लोकांना मुख्यमंत्री मदत घोषित करतील

  • 06 Nov 2021 03:26 PM (IST)

    रोहित पवार यांनी नगर दुर्घटनेतील मृतांना वाहिली श्रद्धांजली

    नगरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेने अत्यंत दुःख झालं. याबाबत सरकार निश्चित चौकशी करेल,असा विश्वास आहे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना!

  • 06 Nov 2021 03:25 PM (IST)

    मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर 

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली
    या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश
    या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली.
    ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर 
    दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश
    राजेश टोपे यांची ट्विटरवरून माहिती
  • 06 Nov 2021 03:23 PM (IST)

    आग प्रकरणी प्राजक्त तनपुरे यांनी दिले चौकशीचे आदेश

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आग प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती तनपुरे यांनी दिले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली का लागली याची माहिती आल्यानंतर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे

  • 06 Nov 2021 03:22 PM (IST)

    नगरच्या घटनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक

    विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ट्विट

    नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

  • 06 Nov 2021 03:03 PM (IST)

    रुग्णालयाला आग लागण्याच्या घटना सतत घडत असूनही राज्य प्रशासन अजूनही निद्रस्त : चंद्रकांत पाटील

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला आग लागल्याची धक्कादायक घटना आताच ऐकिवात आली. रुग्णालयाला आग लागण्याच्या घटना सतत घडत असूनही राज्य प्रशासन अजूनही निद्रस्त आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. प्रशासनाने आतातरी त्वरित योग्य कारवाई करावी.

  • 06 Nov 2021 02:59 PM (IST)

    अहमदनगर रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या चौकशीचे आदेश, राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत: राजेश टोपे

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

  • 06 Nov 2021 02:56 PM (IST)

    आग प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करणार, जि्लहाधिकारी राजेंद्र भोसले

    अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयात आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत 10 कोरोनाबधित रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील ICU विभागाला आग लागली. शॉर्टसर्किट मुळे ही लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या ICU विभागात एकूण 17 रुग्ण हे उपचार घेत होते. सर्वच्या सर्व गुण आहेत कोरणा बाधित होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत 10 रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तर एक रुग्ण हा गंभीर जखमी झालेला आहे.   दरम्यान ज्या इमारतीलाही आग लागली ती इमारत दीड वर्षापूर्वी बांधण्यात आली होती. त्यामुळे या इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे. असे असले तरी याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
  • 06 Nov 2021 02:51 PM (IST)

    नगरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी : रोहित पवार

  • 06 Nov 2021 02:47 PM (IST)

    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार अहमदनगरच्या रुग्णालयाला भेट देणार

    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार अहमदनगरच्या रुग्णालयाला भेट देणार आहेत. आग लागलेल्या घटनास्थळाची त्या पाहणी करतील, अशी माहिती आहे.

  • 06 Nov 2021 02:31 PM (IST)

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

    आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत

  • 06 Nov 2021 02:14 PM (IST)

    राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे जिल्हा रुग्णालयात दाखल…

    अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरण

    राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे जिल्हा रुग्णालयात दाखल…

    जिल्हा रुग्णालय ICU विभागाला लागलेल्या आगीची केली पाहणी

  • 06 Nov 2021 02:13 PM (IST)

    फायर ऑडिट मध्ये त्रुटी असल्याचा स्थानिक आमदार संग्राम जगताप यांचा आरोप

    अहमदनगर जिल्हा रुग्णालय ICU विभागाला भीषण आग

    आगीत 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय असून 1 जण गंभीर

    या ICU विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते

    फायर ऑडिट मध्ये त्रुटी असल्याचा स्थानिक आमदार संग्राम जगताप यांचा आरोप

    तर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची जगताप यांची मागणी

  • 06 Nov 2021 02:04 PM (IST)

    अहमदनगर येथे लागलेल्या आगीची चौकशी करण्यात यावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

    अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

  • 06 Nov 2021 02:02 PM (IST)

    आग प्रकरणाची चौैकशी करुन दोषींवर कारवाई करणार, सरकार मदत करणार: नवाब मलिक

    अहमदगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीचीचौैकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. सरकारतर्फे मृतांच्या नातेवाईकांना आणि गंभीर जखमींना मदतीची घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत.

  • 06 Nov 2021 02:00 PM (IST)

    आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी, सत्यजीत तांबे यांची मागणी

  • 06 Nov 2021 01:59 PM (IST)

    अमित शाह यांच्याकडून अहमदगरच्या घटनेबद्दल शोक व्यक्त

  • 06 Nov 2021 01:57 PM (IST)

    बाळासाहेब थोरात आणि सदाशिव लोखंडे जिल्हा रुग्णालयाला भेट देणार

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार सदाशिव लोखंडे थोड्याच वेळात जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करणार आहेत.

  • 06 Nov 2021 01:35 PM (IST)

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला आग, 10 जणांचा मृत्यू जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

    अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. तर, एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील देण्यात आलीय. आयसीयूमध्ये 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. या घटनेनं अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीनं अहमदनगरकडे रवाना झाले आहेत.

Published On - Nov 06,2021 12:21 PM

Follow us
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.