Ahmednagar Hospital Fire : अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयात आग, 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू, पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने नगरला रवाना
अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयाला आग लागून 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
अहमदनगर : अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयाला आग लागून 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेने नगर शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने कोल्हापूरवरुन अहमदनगरकडे रवाना झाले आहेत.
नगरच्या सरकारी रुग्णालयात आग, 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू
राज्यात सगळीकडे दिवाळीचा उत्साह सुरु असताना इकडे नगरमध्ये आज सकाळी साडे दहाच्या सुमारास सरकारी रुग्णालयाला आग लागली. ग्राऊंड फ्लोअरवर अतिदक्षता विभागाला आग लागली. या विभागात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते.
आग लागताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पण आग मोठी होती. काही वेळातच आगीने संपूर्ण अतिदक्षता विभाग व्यापला. याच विभागातील 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. जवळपास दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं.
मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनाबाधित
रुग्णालयातील ICU विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा कोरोनाविरोधी लढा सुरु होता. मात्र आज आग काळ बनून आली. शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत यातील 10 रुग्णांचा भाजून मृत्यू झाला आहे. सर्व रुग्ण हे कोरोनाबधित होते.
Ahmednagar | नगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयालच्या ICU विभागाला लागली भीषण आग #Ahmednagar #Hospital #Fire #ICU pic.twitter.com/sV8wMg9lNa
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2021
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काय सांगितलं?
“आयसीयूमध्ये 17 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. प्राथमिक माहितीत शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीसंबंधी पुढील चौकशी सुरु आहे”, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांनी दिली आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले?
सरकारी रुग्णालयाला आग लागल्याचं कळताच नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने कोल्हापूरवरुन नगरकडे रवाना झाले आहेत. प्रथम त्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांच्याकडून माहिती घेतली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर रुग्णालयाला लागलेल्या आगीसंबंधी जो कुणी जबाबदार असेल, त्याच्यावर कारवाई केली जाणार, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईक यांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असल्याचं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं आहे.
(Ahmednagar District Civil Hospital Fire broke out live update at icu ten people died in fire)
हे ही वाचा :