AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनोखी कर्तव्यनिष्ठा, मुलाकडून थेट आईवर कारवाई, अहमदनगरच्या पाथर्डीत नेमकं काय घडलं?

अहमदनगरमधील पाथर्डी नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्यांनं थेट आईवरचं कारवाई करुन नात्यांपेक्षा कर्तव्यनिष्ठा महत्वाची आहे हे दाखवून दिलं आहे. Pathardi Rashid Shaikh

अनोखी कर्तव्यनिष्ठा, मुलाकडून थेट आईवर कारवाई, अहमदनगरच्या पाथर्डीत नेमकं काय घडलं?
अहमदनगरमध्ये मुलाकडून आईनं विक्रीसाठी आणलेला भाजीपाला जप्त
| Updated on: May 08, 2021 | 5:47 PM
Share

अहमदनगर: महाराष्ट्र सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ब्रेक द चेनचे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. काही जण कळत नकळत निर्बंध मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. शासकीय कर्मचारी निर्बंध मोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. अहमदनगरमधील पाथर्डी नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्यांनं थेट आईवरचं कारवाई करुन नात्यांपेक्षा कर्तव्यनिष्ठा महत्वाची आहे हे दाखवून दिलं आहे. (Ahmednagar Pathardi Municipal Council employee Rashid Shaikh take action against his mother for violating corona rules)

नेमकं काय घडलं?

पाथर्डी नगरपरिषदेमध्ये रशीद शफी शेख हे कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. रशीद शफी शेख यांनी त्यांचं कर्तव्य बाजावताना त्यांच्या आईवर कारवाई करुन शासकीय कर्तव्याचं पालन केलं.

कर्तव्याला प्राधान्य

पाथर्डी शहरात रशीद शेख यांच्या आई एका रस्त्यावर भाजीपाला विक्री करत होत्या. नगरपरिषदेचं पथक शहरातून फिरत असताना त्यांच्या निदर्शनासी ही बाब आळी. त्यामुळे रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या आईवर रशीद शेख यांनी कारवाई केली. सर्व भाजीपाला जप्त केला.

भाजीपाला जप्त

रशीद शफी शेख यांनी त्यांच्या आईवर भाजीपाला विक्री प्रकरणी कारवाई केली. रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्यासाठी सध्या मनाई आहे. मात्र, मनाई असताना भाजीपाला विकणाऱ्या आईनं विक्रीसाठी आणलेला भाजीपाला त्यांनी जप्त करत नगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकला. शहरात एका पालिका कर्मचाऱ्याने आपल्या आईवर कारवाई करत कर्तव्याला प्राधान्य दिले. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

सातारा जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आठ दिवसाचा कडक लॉकडाऊन जिल्हयात सुरु आहे. या लॉकडाऊनचा पाचवा दिवस असून सातारा तालुका पोलीसांनी वडूथ गावातील चौकात विनाकारण फिरणार्‍या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी योग्य कारण न सांगितल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जात असून मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंग न पाळणे अशा नागरिकांवर कारवाई केली गेलीय. आठवडा भरात तालुका हद्दीत 240 विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 10 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या:

संजय राठोडांवर तूर्तास कारवाई नाही, मुख्यमंत्र्यांची वेट अँड वॉचची भूमिका; वाचा सीएमच्या भूमिकेचं विश्लेषण 

अ‍ॅडमिट होण्यासाठी कोरोना रिपोर्टची गरज नाही; वाचा रुग्णालयात भरती होण्याचे सर्व नवे नियम!

(Ahmednagar Pathardi Municipal Council employee Rashid Shaikh take action against his mother for violating corona rules)

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.