Akola Flood : पुर्णा नदीत वाहून गेल्या आजीबाई, तब्बल 20 तासांनंतर युवकांनी काढले बाहेर, दैव बलवत्तर म्हणून बचावल्या
नदीच्या मध्यभागी 20 तास सलग अडकून पडलेल्या आजींना बाहेर काढले. एन्डलीच्या युवकांनी वेगळाच आदर्श प्रस्थापित केला. या युवकांचे कौतुक केले जात आहे. सध्या आजी सुखरूप आहे.
अकोला : देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात. याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यात आला. तब्बल वीस तास पुरात वाहून गेल्यानंतरही आजीबाई सुखरुप बाहेर निघाल्या. आवाज येताच युवक मदतीला धावले. अकोल्यातल्या राणे आजीबाई. अमरावतीतील मंदिरात दर्शनासाठी (Darshan) गेल्या. पुर्णा काठावर त्या घसरून पडल्या. युवकानं त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, तो काही यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर आजीबाईसाठी शोधमोहीम राबविण्यात आली. पण, त्या पुरासोबत वाहून गेल्या. आज सकाळ मुर्तीजापूर (Murtijapur) तालुक्यातील एंडली (Endli) येथे मुलगा बकऱ्या चारत होता. त्याला आजीबाईचा आवाज आला. युवकांनी पाण्यात उड्या मारल्या. आजीबाईला बाहेर काढले. तब्बल वीस तास आजीबाई नदीतील पाण्यासोबत वाहून गेल्या. पण, नशिब बलवत्तर म्हणून त्या बचावल्या.
मंदिराच्या घाटावर काय घडलं
21 जुलैला दुपारी पूर्णा नदीकाठावर घटना. अमरावती जिल्हातील ऋण मोचन (ता.भातकुली) येथील श्री मुद्गलेश्वर मंदिराच्या घाटाचा परिसर. अकोला जिल्हातल्या आपतापा येथील राणे नामक आजीबाई दर्शनासाठी आल्या होत्या. अचानकपणे त्यांचा तोल जाऊन त्या नदी पात्रात पडल्या. पूर्णा नदी दुधडी भरून वाहत होती. त्या दूरवर वाहून जात होत्या. ते पाहून संत गाडगे महाराज मंदिरावर उपस्थित असणारे एका युवक त्यांच्या मदतीला धावला. त्यांना वाचविण्याचा युवकानं प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न असफल राहिला. तरीपण रात्री बराच वेळपर्यंत त्यांचा शोध घेणे चालू होते.
आजीबाईंचा आवाज आला नि युवक धावले
आज सकाळी अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या एन्डली येथील घटना. नदीत गावातील एक युवक बकऱ्या घेऊन गेला होता. त्याला आजीचा आवाज ऐकू आला. त्यानंतर एन्डली येथील युवकांनी पाण्यात उड्या घेऊन त्यांना बाहेर काढले. काळ आला पण वेळ मात्र आली नव्हती, असेच म्हणता येईल. नदीच्या मध्यभागी 20 तास सलग अडकून पडलेल्या आजींना बाहेर काढले. एन्डलीच्या युवकांनी वेगळाच आदर्श प्रस्थापित केला. या युवकांचे कौतुक केले जात आहे. सध्या आजी सुखरूप आहे.