काय तर म्हणे मुंबई आमची आहे, त्यांच्या काकांनी ठेवलंय मुंबई ह्यांची आहे; अजित पवार यांनी सुनावलं

तरीही कर्नाटकचे मंत्री, मुख्यमंत्री बेताल वक्तव्य करतात. हेही सभागृहात लक्षात आणून दिल्याचं काम केलं.

काय तर म्हणे मुंबई आमची आहे, त्यांच्या काकांनी ठेवलंय मुंबई ह्यांची आहे; अजित पवार यांनी सुनावलं
अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 9:45 PM

कोल्हापूर : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न हा ज्वलंत आहे. यासाठी अनेकांनी जीवाची पर्वा केली नाही. कारवार, बेळगाव आणि ८५६ गावं मराठी भाषिकांची आहेत. मराठी भाषिक गावं महाराष्ट्र राज्यात आली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं नंबर एकचे वकील लावावेत. हरीश साळवे यांच्याकडं हे प्रकरण द्या. वाहनं कर्नाटकात गेल्यानंतर तोडफोड करायची. वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं. आम्हालाही भावना आहेत. असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. कोल्हापुरात ते बोलत होते.

एक इंज जागा देणार नाही, असं म्हणणारे तु्म्ही कोण. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यावर तुम्ही काय करणार. सगळे जण झटलो. देशातल्या लोकांना कोणत्याही राज्यात जाण्याचा अधिकार आहे.

कर्नाटकी म्हणतात मुंबई आमची आहे. यांच्या काकांनी ठेवली मुंबई. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. त्यासाठी १०६ लोकांनी हुतात्मे पत्करले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले. कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोम्मई हेही भेटीत उपस्थित होते. काही होणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. तरीही कर्नाटकचे मंत्री, मुख्यमंत्री बेताल वक्तव्य करतात. हेही सभागृहात लक्षात आणून दिल्याचं काम केलं.

गेल्या तीन पिढ्यांपासून आपण ही मागणी करत आहोत. ते जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मराठी भाषिकांच्या पाठीशी उभा आहे. विधिमंडळाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला सांगितलं आहे. त्यासाठी ठराव करण्यात आला असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

महाराष्ट्र-कर्नाटक वाद काही थांबायचं नाव घेत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यावर तोडगा निघेल. तोपर्यंत दोन्ही राज्यातील नेते आपआपल्या सोयीनुसार बोलताना दिसून येत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.