Akola | 22 व्या वर्षी हरविलेल्या युवकाचे 42 वर्षांनंतर गावात आगमन, आगरा गावात आनंदाचे वातावरण
सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवंगत शंकर मीराजी शिरसाट यांचा दत्तक पुत्र उत्तम शिरसाट (Uttam Shirsat) यांनी औरंगाबाद येथे 1975 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये ( Babasaheb Ambedkar College ) शिक्षण घेतले. 1980 मध्ये नोकरी शोधण्यासाठी शहरात गेले होते. पण अनेक दिवसांपासून पत्र व्यवहार न झाल्याने परिवारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
अकोला : जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील आगर (Agar in Balapur taluka) येथील प्रतिष्ठीत नागरिक तथा जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवंगत शंकर मीराजी शिरसाट राहत होते. त्यांचा दत्तक पुत्र उत्तम शिरसाट हे वयाच्या 22 व्या वर्षी नोकरी निमीत्त आक्टोबर 1980 साली घरून निघून गेले होते. ते 42 वर्षांनंतर आगर गावात परतले आहेत. येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवंगत शंकर मीराजी शिरसाट यांचा दत्तक पुत्र उत्तम शिरसाट (Uttam Shirsat) यांनी औरंगाबाद येथे 1975 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये ( Babasaheb Ambedkar College ) शिक्षण घेतले. 1980 मध्ये नोकरी शोधण्यासाठी शहरात गेले होते. पण अनेक दिवसांपासून पत्र व्यवहार न झाल्याने परिवारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
मुलगा हरविल्याची तक्रार दिली होती
त्यांनी नातेमंडळीकडे शोधाशोध केली. परंतु कुठेच पत्ता लागला नव्हता. अखेर उरळ पोलीस स्टेशन व आकाशवाणीवरून मुलगा हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. मुलगा अनेक वर्षे न मिळाल्याने शोध मोहीम थांबली होती. प्रतिष्ठित नागरिक शंकर मीराजी शिरसाट यांचे निधन झाले असले तरी आज रोजी त्यांचा परिवार आगर येथे आहे. 29 मार्चला संध्याकाळी दत्तकपुत्र उत्तम शिरसाट हे पत्नी व मुलासह आगर येथे दाखल झाले आहेत.
गावाच्या ओढीने गावात परतले
या प्रकरणाने परिवारात व आगरसह परिसरातील अनेक ठिकाणी कौतुकाचा विषय झाला. नेमकं दत्तकपुत्र उत्तम शिरसाट इतकेवर्षे कुठे होते, काय करत होते. इतक्या वर्षाने कसे काय परत आले. हा विषय गावात रंगला होता. पण इतक्या वर्षाने दत्तकपुत्र घरी आल्याने सगळीकडं आनंदाच वातावरण होतं. गावातला माणूस कितीही दूर गेला, तरी त्याला गावाची आठवण ही येतेच. अशीच आठवण कदाचित उत्तम शिरसाट यांनी आली असेल. काही का असेना ते शेवटी गावच्या मातीत आले. याचा गावकऱ्यांसह त्यांनाही आनंद आहे.