अकोल्यात मुसळधार पाऊस, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याला फटका, तब्बल 900 कोंबड्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

तब्बल 900 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुक्कुटपालन केंद्र चालवणाऱ्या रवी मोहिते यांनी केली आहे.

अकोल्यात मुसळधार पाऊस, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याला फटका, तब्बल 900 कोंबड्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
अशा प्रकारे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 9:02 PM

अकोला : जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या मुसळदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसात पेढी शिवारातील मोहिते कुक्कुटपालन केंद्रामधील तब्बल 900 कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. शेताला लागून असलेल्या नाल्याचे पाणी आत शिरल्यामुळे हा प्रकार घडला आहे. तब्बल 900 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुक्कुटपालन केंद्र चालवणाऱ्या रवी मोहिते यांनी केली आहे. (Akola 900 hens of man who runs poultry farm in Murtijapur have been died due to heavy rain demand compensation)

आर्थिक तडजोड करून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला

मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मधापुरी येथील 30 वर्षीय सुशिक्षित बेरोजगार रवी मोहिते यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोहिते यांनी आर्थिक तडजोड करून याकरीता कुरुम रेल्वे स्टेशनलगत असलेल्या शेतात पाच हजार पक्षीपालनासाठी टिन शेड उभे केले. आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील व्यंकटेश्वरा या कंपनीकडून पक्ष्यांचे संगोपन व पालन करून कमिशन तत्वावर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.

जवळपास 70 हजार रुपयांचे नुकसान

याच्या मोबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नातून मोहिते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत. मात्र, रविवारी रात्री पावसामुळे शेताच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याचे पाणी कुक्कुटपालन केंद्राच्या आत शिरले. यामुळे कोंबड्यांच्या 4 हजार 300 पिल्लांतील जवळपास 900 पिल्लं पाण्यात बुडून मरण पावले. तसेच सोबत पशुखाद्याच्या बॅगसुद्धा खराब झाल्या. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहिते यांचे जवळपास 70 हजार रुपयांचे नुकसान झाले.

शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी

दरम्यान, कुरुम येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार जयस्वाल, डॉ. अतुल रेवस्कर यांनी घटनास्थळी मृत पावलेल्या पक्ष्यांचा पंचनामा केला आहे. सुशिक्षित बेरोजगार रवी मोहिते यांनी उभ्या केलेल्या व्यवसायाचे नैसर्गिक आपत्तीमूळे नुकसान झाले. त्यामुले शासनाने त्यांना त्वरित आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Video | मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर, चरायला गेलेल्या जाफराबादी म्हशी गेल्या वाहून, एकीचा मृत्यू

प्रियकराबरोबर लग्न लावून देण्याच्या नावाखाली प्रेयसीची साडेचार लाखांची फसवणूक

वाकून बघताना तोल गेला, महिला समुद्रात पडली, 50 वर्षीय फोटोग्राफरने जीवाच्या बाजीने वाचवलं

(Akola 900 hens of man who runs poultry farm in Murtijapur have been died due to heavy rain demand compensation)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.