“स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी अमित शाह यांच्या मुंबईच्या वाऱ्या”; ठाकरे गटाचा भाजपला टोला…
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर आता अमित शाह यांचा मुंबई दौरा निघाला असल्याने ठाकरे गटाकडून ही टीका केली गेली आहे.
अकोला : राज्यातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला एकीकडे महाविकास आघाडीची नागपूरमध्ये सभा होत असल्याने त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे भाजपमध्येही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आल्याने मुंबईसह राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून भाजपवर टीका करताना विरोधी पक्षनेत्यानी या दौऱ्याला त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीशी संबंध जोडत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यावरून अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावरून अंबादास दानवे म्हणाले की, मुंबई महापालिकेवर यंदा भाजपला झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील नेते आणून मुंबईकरांना भूरळ घालण्याचा प्रयत्न भाजपवाले करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला जिंकायचे आहे. त्यासाठी हा भाजपने हा चंग बांधला आहे. त्यामुळे अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांना आणून मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न भाजपकडूने केला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाची एवढी ताकद आहे ही त्यामुळेच त्यांच्याबरोबर टक्कर देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मुंबईच्या वाऱ्या करावा लागत असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे प्रयत्न वांझोटे ठरणार असल्याचा टोलाही विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अमित शाह यांना लगावला आहे. अंबादास दानवे हे अकोला जिल्ह्यातल्या पारस येथे आले असता त्यांनी ही टीका केली आहे.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर आता अमित शाह यांचा मुंबई दौरा निघाला असल्याने ठाकरे गटाकडून ही टीका केली गेली आहे. भाजपने कितीही मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी प्रयत्न केले तरी त्यांना त्यामध्ये यश मिळणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.