AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू, ॲम्ब्युलन्स चालकांची सायरन वाजवून श्रद्धांजली, 15-20 रुग्णवाहिका स्मशानभूमीत

एकदम इतक्या संख्येंने रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे जात असल्यानं अमरावतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला. (Amravati Ambulance March)

Video: रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू, ॲम्ब्युलन्स चालकांची सायरन वाजवून श्रद्धांजली, 15-20 रुग्णवाहिका स्मशानभूमीत
अमरावतीच्या रस्त्यांवरुन एका पाठोपाठ एक रुग्णवाहिका धावत होत्या
| Updated on: May 20, 2021 | 12:30 PM
Share

अमरावती: शहरातील हिंदू स्मशानभूमीच्या दिशेने 15 ते20 रुग्णवाहिका सायरन वाजवत निघाल्या. त्यामुळे अमरावतीकरांच्या मनात धडकी भरली. समान्य रुग्णालय येथील शवविच्छेदनगृहाजवळून सायरन वाजत 15 ते 20 रुग्णवाहिका हिंदू स्मशानभूमीकडे जात होत्या. सायरनचा जोरदार आवाज करीत या रुग्णवाहिका रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भूतवश्वर चौक येथून हिंदू समशानभूमीकडे निघाल्या. इतक्या रुग्णवाहिका निघाल्याचे पाहून नागरिक चांगले धास्तावले होते. एकदम इतक्या संख्येंने रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे जात असल्यानं अमरावतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला. कोरोनाची तिसरी लाट अमरावतीत सुरु झाल्याच्या चर्चा असतानाच रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाल्यानं अमरावतीकरांमध्ये खळबळ माजली होती. (Amaravati Ambulance drivers organised march for tribute their colleague who died due to corona )

नेमकं प्रकरण काय?

शहरातील एका रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाली. यावेळी त्याच्या सहकारी रुग्णवाहिका चालकांनी त्याच्या अंत्ययात्रेत रुग्णवाहिका नेऊन सहभाग घेतला. आपल्या सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होताना अनेक रुग्णवाहिका चलक सायरन वाजवत निघाल्याने अमरावतीकरांमध्ये दहशत निर्माण झाली.

पाहा व्हिडीओ

सहकाऱ्याला अनोखी श्रद्धांजली

रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवणे बेकायदेशीर असताना ऐन कोरोनाकाळात सायरन वाजवत 15 ते 20 रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाल्याने अमरावतीमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत रुग्णवाहिका चालकांशी संपर्क केला असता त्यांनी आमच्या सहकाऱ्याचा कोरोनानं मृत्यू झाला. त्याला आम्ही अशा प्रकारे श्रद्धांजली दिली अशी माहिती रुग्णवाहिका चालकांनी दिली.

अमरावतीमध्ये कोरोनाची तिसरी लाट?

अमरावती जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट झाला. दर 1.41 मिनिटाला एक रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झालेला आहे. दर दोन तासांत एका बाधिताचा मृत्यू झाल्याने ही बाब अमरावती मधील नागरिकासांठी काळजी वाढवणारी ठरली. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढायला सुरुवात झाली होती.

अमरावती कोरोना अपडेट

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात दिसून आलं.  फेब्रुवारीमध्ये 12230 कोरोना रुग्ण आढळले त्यापैकी  92 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे मार्च महिन्यात 12518 आढळले त्यापैकी 164 रुगणांचा मृत्यू झाला.  एप्रिल महिन्यात  16689 रुग्ण आढळले आणि  410  रुग्णांचा जीव गेला. मे महिन्यातील 1 मे ते 17 मे पर्यंत  18020 रुग्ण आढळले असून 313 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या:

Sunday special story | 2020 मध्ये व्हायरल झालेले ‘हे’ व्हिडीओ पाहिलेत का?, बघा स्पेशल 10 व्हिडीओ

Maratha Reservation: पंतप्रधान मोदींना चारवेळा पत्र दिले, अद्याप भेट दिली नाही; संभाजीराजे संतापले

(Amaravati Ambulance drivers organised march for tribute their colleague who died due to corona )

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.