Amravati DCC Bank election : बच्चू कडू जिंकले, पण पॅनलचं काय? यशोमती ठाकूरांच्या पॅनलला कडवं आव्हान
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Amravati DCC bank Result) राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विजय मिळवत परिवर्तन पॅनलचं खातं उघडलं आहे.
अमरावती: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Amravati DCC bank Result) राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विजय मिळवत परिवर्तन पॅनलचं खातं उघडलं आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे या निवडणुकीच्या निमित्त आमने सामने आल्यानं सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडं लागलं होतं. 4 ऑक्टोबरला जिल्हा बँकेसाठी मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी होत आहे. जिल्हा बँकेच्या मतमोजणी पहिला निकाल हा बच्चू कडू आणि राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांच्या परिवर्तन पॅनलच्या बाजूनं लागला आहे. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलनं आघाडी घेतली आहे. सहकार पॅनल 8 जागांवर, परिवर्तन पॅनल 4 आणि अपक्ष उमेदवारांनी 3 जागांवर विजय मिळवला आहे.
सहकार पॅनलची आघाडी
परिवर्तन पॅनलचे उमेदवार व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पहिला विजय नोंदवला आहे. कडू यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे माजी अध्यक्ष बबलु देशमुख यांचा पराभव केला आहे. बच्चू कडू यांना 22 तर बबलु देशमुख यांना 19 मते मिळाली आहेत. बच्चू कडू यांच्या विजयाच्या निमित्तानं अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत परिवर्तन पॅनलने खाते उघडले आहे. यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलनं आघाडी घेतली आहे. सहकार पॅनल 8 जागांवर, परिवर्तन पॅनल 4 आणि अपक्ष उमेदवारांनी 3 जागांवर विजय मिळवला आहे.
4 उमेदवार बिनविरोध
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला निकाल बच्चू कडू यांच्या पॅनलकडे गेला आहे. बँकेच्या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर याच सहकार पॅनल बाजी मारते की राज्यमंत्री बच्चू कडू याच परिवर्तन पॅनल बाजी मारणार हे पाहणे औतुक्याच ठरणार आहे निवडणुकीत 1687 पैकी 1579 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी 4 उमेदवारांची बिनविरोध निवडणूक झाल्यानं 17 जागांवर ही निवडणूक पार पडली. बिनविरोध झालेल्या 4 उमेदवारांपैकी 2 उमेदवार सहकार पॅनल आणि 2 उमेदवार परिवर्तन पॅनलचे आहेत.
बँकेवर सत्ता कोणाची?
अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत असून संपूर्ण राज्यातील राजकीय नेत्यांचं लक्ष अमरावतीकडं लागलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू हे आमने सामने आले आहेत. जिल्हा बँकेत काँग्रेसची सलग 10 वर्ष सत्ता होती. ही सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके,राज्यमंत्री बच्चू कडूंसह इतर नेते एकत्र आले आहेत..
बच्चू कडू समर्थकांचा जल्लोष
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काल निवडणूक पार पडली, यात परिवर्तन व सहकार पॅनल होते यात राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा परिवर्तन पॅनल कडून निवडणूक रिंगणात होते आज मतमोजणी पार पडली यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव करत बच्चू कडू यांनी दोन मतांनी विजय मिळवला यात बच्चू कडू विजयी होताच समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला
आतापर्यंत हाती आलेले निकाल
सहकार पानेल 8 विजयी उमेदवार— 1.वीरेंद्र जगताप चांदूर रेल्वे
2. श्रीकांत गावंडे धामणगाव
3. सुरेश साबळे तिवसा
4. सुधाकर भारसाकडे दर्यापूर
5. हरिभाऊ मोहोड भातकुली
6. सुनील वऱ्हाडे अमरावती
7. दयाराम काळे चिखलदरा 8. प्रकाश काळबांडे सहकारी पत संस्था…
परिवर्तन पॅनल चे विजयी उमेदवार 1. राज्यमंत्री बच्चू कडू चांदूरबाजार 2. चित्रा डहाने मोर्शी 3. अजय मेहकरे अंजनगाव सूर्जी 4. जयप्रकाश पटेल धारणी
अपक्ष विजयी उमेदवार 1. अभिजित ढेपे नांदगाव खंडेश्वर 2. नरेशचंद्र ठाकरे वरुड 3. आनंद काळे अचलपूर
इतर बातम्या:
Pandora Papers: सचिन तेंडुलकरनंतर अनिल अंबानी, जॅकी श्रॉफ आणि नीरा राडियाही अडचणीत?
Amravati DCC Bank election result live updates Bachhu Kadu win defeat Babalu Deshmukh candidate of Yashomati Thakur Panel