Tarapur Fire : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत स्फोट, आगीत एकाचा होरपळून मृत्यू

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केंबोड केमिकल या कंपनीत आज सकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटमुळे कंपनीत भीषण आग लागली. आगीचे वृत्त कळताच बोईसर एमआयडीसी पोलिस आणि अग्नीशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. यानंतर कंपनीतील सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

Tarapur Fire : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत स्फोट, आगीत एकाचा होरपळून मृत्यू
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत स्फोटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 3:38 PM

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या भीषण आग (Fire) लागल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या दुर्घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. दुलेश पाटील असे मयत कामगाराचे नाव असून तो कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर पदावर कार्यरत होता. कॅम्लीन नाका परिसरातील प्लॉट नंबर E-6/3 व E-4 स्थित केंबोंड केमिकल या कंपनीत ही भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या व बोईसर एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कंपनीतील कामगारांना कंपनी बाहेर सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. (An explosion at a chemical company in Tarapur industrial area one died in the fire)

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केंबोड केमिकल या कंपनीत आज सकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटमुळे कंपनीत भीषण आग लागली. आगीचे वृत्त कळताच बोईसर एमआयडीसी पोलिस आणि अग्नीशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. यानंतर कंपनीतील सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र कंपनीतील प्रोडक्शन मॅनेजर दुलेश पाटील यांचा दुर्दैवाने होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून अग्निशमन दल पुढील तपास करीत आहे.

मुंबईतही इमारतीला आग

खार पश्‍चिम येथील नाँथन व्हिला इमारतीला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या चौथ्या मजल्याला लेवल 2 ची आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान आगीचे वृत्त समजताच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळावर तात्काळ धाव घेतली. तसेच अग्निशमन दल अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सद्यस्थितीत आग पूर्णपणे आटोक्यात आली असल्याचे माजी महापौरांनी सांगितले. (An explosion at a chemical company in Tarapur industrial area one died in the fire)

इतर बातम्या

Nashik Crime : नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली 15 लाख हडपले; अभियंत्यासह महिला सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा

Nashik Gambling : नाशिकमध्ये बिंगो रौलेट जुगारातून 45 लाखांची फसवणूक; पोलिसांच्या दोघांना बेड्या

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.