कृष्णाकाठी रंगला पावसाळ्यात मैदानी खेळ, खेळ पाहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी

ग्रामीण भागात खेळताना पंचाशिवाय हा डाव चालत असल्याने यात खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीचेही दर्शन घडते. हा खेळ मराठमोडा असून या खेळासाठी वेग, तंत्र चपळता आणि डावपेचाची आखणी ही फार गरजेची असते.

कृष्णाकाठी रंगला पावसाळ्यात मैदानी खेळ, खेळ पाहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 4:11 PM

सांगली : पाऊस सुरु झाला की पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णा नदीकाठचे मैदान सुरफाट्याच्या डावाने फुलून जाते. पाऊस असो वा चिखल, या खेळाची रंगत वाढेल. पण कमी होत नाही. कृष्णाकाठी पावसाळ्यातील लोकप्रिय खेळ सुरफाट्या सुरवात झाली आहे. आता नवी पिढी पहिल्यांदांच मैदानात उतरली असल्याने या खेळाची रंगात चांगलीच वाढत आहे. याउलट रिमझिम पावसात सुरफाट्यांचा डाव आणखी बहरात येतो. सुरफाट्या खेळण्यासाठी आणि पाहण्यासाठी पावसाळ्यात रोज सायंकाळी अबालवृध्द कृष्णाकाठी एकत्र जमतात. गेल्या काही वर्षात मोबाईल, टीव्ही, इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली नवीन पिढी मैदानाकडे फिरकतही नव्हती. यंदा मात्र लहान मुलांनी पहिल्यांदाच या रांगड्या गावटी खेळाला पसंती दिल्याने मैदान बच्चे कंपनीने फुलून गेले आहे.

sangli 2 n

अन्न पचण्यासाठी फायद्याचा खेळ

सुरफाट्या खेळण्यास अत्यंत सोप्या तसेच काही खर्च ही लागत नाही. ही या डावाची जमेची बाजू म्हणावी लागेल. पावसाळ्यात एक चांगला विरंगुळा आणि खाल्लेलं अन्न पचवण्यासाठीही अनेक जण काही डाव खेळून सुरफाटीचा आनंद लुटतात. आज क्रीडा क्षेत्रात देशभर क्रिकेटच्या मक्तेदारीचा डंका वाजत असताना ग्रामीण भागात खेळला जाणारा सुरफाट्याचा खेळ आजही तितकाच लोकप्रिय आहे. याला अनेक ठिकाणी आट्यापाट्या नावानेही संबोधतात.

खिलाडू वृत्तीचे होते दर्शन

ग्रामीण भागात खेळताना पंचाशिवाय हा डाव चालत असल्याने यात खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीचेही दर्शन घडते. हा खेळ मराठमोडा असून या खेळासाठी वेग, तंत्र चपळता आणि डावपेचाची आखणी ही फार गरजेची असते. तरच या खेळामध्ये खेळाडूंचा सांघिक प्रयत्न संघाला जिंकवू शकतो.

उत्तम व्यायाम, चांगले मनोरंजन

कबड्डी, कुस्ती, खोखो प्रमाणेच सुरफाट्या हा खेळही मराठी मातीतला पण तरीही दुर्लक्षित आहे. सांघिक आणि वैयक्तिक कौशल्य पणाला लागत असलेल्या या खेळात उत्तम व्यायाम तसेच चांगलं मनोरंजनही होते. एका संघातील खेळांडूनी दुस-या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये अडविणे आणि अडवलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी स्थूल रूपरेषा असलेल्या हा महाराष्ट्रीय खेळ. या मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो. पावसाळ्यानंतर हा सुरफाट्या खेळ फारसा खेळला जात नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.