वाईन विक्रीविरोधात अण्णांचा उपोषणाचा इशारा; राज्य सरकारकडून हालचाली, प्रधान सचिव नायर अण्णांच्या भेटीला

राज्य सरकारकडून किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देणयात आली आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे अण्णा हजारे यांनी देखील वाईन विक्रीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वाईन विक्रीविरोधात अण्णांचा उपोषणाचा इशारा; राज्य सरकारकडून हालचाली, प्रधान सचिव नायर अण्णांच्या भेटीला
अण्णा हजारे
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 9:23 PM

अहमदनगर : राज्य सरकारकडून किराणा दुकानांमध्ये (grocery stores) वाईन विक्री (Wine sales) करण्याची परवानगी देणयात आली आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी देखील वाईन विक्रीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. अहमदनगरमधील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यात येणार आहे. याविरोधात अण्णांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. येत्या 14 तारखेपासून अण्णा वाईन विक्रीविरोधात राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार आहेत. अण्णांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह या राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाल्या. त्यांनी जवळपास तासभर अण्ण हजारे यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीनंतर अण्ण हजारे यांनी आपण 50 टक्के समाधानी असल्याचे म्हटले आहे. सध्या तरी आपण उपोषणावर ठाम आहोत. उद्या ग्रामसभा घेऊन निर्णय घेऊ, सरकारने लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी यावेळी दिली आहे. मात्र दुसरीकडे अण्णा हजारे हे पूर्णपणे समाधानी असल्याचा दावा नायर यांनी केला आहे,

बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा?

राज्य सरकारने किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर नायर या वाईनचा निर्णय आणि अंमलबजावणीबाबत अण्णांना माहिती देण्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये आल्या होत्या. यावेळी वल्सा नायर आणि अण्ण हजारे यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांची देखील उपस्थिती होती.  सरकारने वाइन विक्री संदर्भात निर्णय घेतला असला तरी, अंमलबजावणी करण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. यामध्ये मुख्यतः राज्यातून या निर्णयाबाबत असलेल्या हरकती जाणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती यावेळी बोलताना नायक यांनी अण्णा हजारे यांना दिली.

उपोषणाचा इशारा

राज्य सरकारने किराणा दुकांमध्ये वाईन विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. यावरून विरोधक महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवत आहेत. तर दुसरीकडे हा निर्णय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचा दावा महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. सरकार आणि विरोधक यांच्यात वाईन विक्रीवरून वाद सुरू असतानाच आता या वादात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली असून, राज्य सरकारने वाईन विक्रीचा हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Eknath Shinde : वरती आघाडी आहे तर खाली आघाडी करण्यास काय हरकत नाही, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सूतोवाच

10 मार्चनंतर महाविकास आघाडीला सत्ता सोडण्याची वेळ येईल! चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार, कारणही सांगितलं

कल्याणमधील 7 ते 8 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; जितेंद्र आव्हाडांसमोर अपक्ष नगरसेवकाचा दावा

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.