VIDEO : सांगलीत चक्क जेसीबीच्या साह्याने एटीएम फोडले, जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आरग येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील आरग पोलीस मदत केंद्र शेजारी ॲक्सिस बँकेचे एटीएम केंद्र आहे. मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर उभे असलेला जेसीबी चोरट्यांनी चोरी करून नेला. गावातील ॲक्सिस एटीएम केंद्राजवळ आणला आणि जेसीबीच्या साह्याने एटीएम सेंटर फोडले.

VIDEO : सांगलीत चक्क जेसीबीच्या साह्याने एटीएम फोडले, जिल्ह्यातील खळबळजनक घटना
सांगलीत चक्क जेसीबीच्या साह्याने एटीएम फोडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 9:19 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथे चक्क जेसीबीच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम (ATM) फोडण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे गावात मोठी खळबळ माजली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सदर एटीएममध्ये 27 लाखांची रोख (Cash) रक्कम होती. मात्र चोरटे रक्कम न घेताच पसार झाले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मध्य रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र एटीएमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षारक्षकाचा अभाव आहे. यामुळेच चोरट्यांना आयती संधी मिळाली. आरोपींचा शोध घेत त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. (ATMs smashed in Sangli with the help of JCB, Rs 27 lakh cash stolen)

चोरीच्या जेसीबीने एटीएम फोडले

आरग येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील आरग पोलीस मदत केंद्र शेजारी ॲक्सिस बँकेचे एटीएम केंद्र आहे. मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर उभे असलेला जेसीबी चोरट्यांनी चोरी करून नेला. गावातील ॲक्सिस एटीएम केंद्राजवळ आणला आणि जेसीबीच्या साह्याने एटीएम सेंटर फोडले. पुढे जेसीबीच्या साह्याने एटीएम मशीन उचलून सेंटरच्या बाहेर घेतले. पुन्हा जेसीबीच्या साह्याने एटीएमच्या मशीनवर जोरदार घाव घातला. जेसीबीचा मारा इतका जोरदार होता की एटीएम मशीनचे तीन तुकडे झाले. परिस्थितीचा अंदाज घेता चोरट्यांनी एटीएम मशीन 50 मीटर अंतरावर टाकून जेसीबी घेऊन पळ काढला. चोरलेला जेसीबी लक्ष्मीवाडी रोडवर सकाळी आढळून आला. (ATMs smashed in Sangli with the help of JCB, Rs 27 lakh cash stolen)

इतर बातम्या

Pune crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं पुण्यातल्या बावधनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधम रिक्षाचालक फरार

Nashik Accident : बुलडाणा, बीडनंतर आता नाशकात भीषण अपघात! वऱ्हाड्यांनी भरलेला टेम्पो उलटला, 13 जण जखमी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.