Ahmednagar CCTV : व्यावसायिकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न, प्रतिकार करताच झाले पसार

Attempt to rob by throwing Chili powder : डोळ्यांत मिरचीची पूड (Chili powder) टाकून लूटण्याचा प्रयत्न (Attempt to rob) झालाय. आपल्या दैनंदिन कामावरून घरी परतत असताना एका व्यावसायिकासोबत (Businessman) हा प्रकार घडला आहे.

Ahmednagar CCTV : व्यावसायिकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न, प्रतिकार करताच झाले पसार
अहमदनगरमध्ये व्यावसायिकाला लुटताना दरोडेखोर कॅमेऱ्यात कैद
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 9:13 PM

अहमदनगर : (Attempt to rob by throwing Chili powder) डोळ्यांत मिरचीची पूड (Chili powder) टाकून लूटण्याचा प्रयत्न (Attempt to rob) झालाय. आपल्या दैनंदिन कामावरून घरी परतत असताना एका व्यावसायिकासोबत (Businessman) हा प्रकार घडला आहे. घराजवळ पोहोचलेला हा व्यावसायिक घरासमोर कार पार्किंग करत असतानाच कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी या व्यावसायिकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकली. तसेच हत्याराचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला. अहमदनगरच्या नागापूर परिसरातून ही घटना समोर आली आहे. संदीप नागरगोजे असे व्यापाऱ्याचे नाव असून नागापूर परिसरातील आदर्श नगरमधील गुरुकृपा कॉलनीत हा प्रकार घडला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घराच्या गेटच्या आत फेकली पैशांची बॅग

संदीप नागरगोजे यांनी आपल्या घरासमोर गाडी पार्क करताच पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी त्यांच्याशेजारी आपली कार उभी केली. त्यातील एक चोर खाली उतरला आणि त्याने नागरगोजे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. नागरगोजे यांनी प्रसंगावधान राखत पैशांची बॅग घराच्या गेटच्या आत फेकली आणि चोरट्यांचा जोरदार प्रतिकार केला. चोरट्यांनी तेथून पळ काढला.

दबा धरूनच बसले होते

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संदीप नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या परिसरात हा प्रकार घडला त्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. त्यात स्पष्टपणे दिसते, की संदीप नागरगोजे गेटच्या बाहेर पोहोचले आहेत. आपल्या चारचाकीतून ते बाहेर आले आणि गेटजवळ पोहोचतच होते, तेवढ्यात कारमधून आलेल्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यांच्याकडे हत्यारेही होती. हे सर्व लोक दबा धरूनच बसले असावेत, असे दिसते. मात्र प्रसंगावधान राखत नागरगोजे यांनी पैशांची बॅग गेटमध्ये टाकली.

हल्लेखोर पसार

हल्ला करून हल्लेखोर कारमधून पळून गेले. त्यानंतर परिसरातील इतर लोकदेखील बाहेर आले. दरम्यान आता पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पुढील कारवाई होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हा थरार, पाहा Video

आणखी वाचा :

दादरच्या डायमंड ज्वेलरीतील चोरी क्राईम पेट्रोल पाहून; चोरट्यानं सीसीटीव्हीचा ड्राईव्हही पळविला होता

Video : ‘हिंदूहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे…’ फक्त बॅनरबाजीच नाही तर घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी!

‘Reserve Bankचा सहकारी संस्थांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चत्मकारिक, समस्या सोडविण्यासाठी Modi Shah यांच्याकडे घेऊन जाईन’

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.