डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन साताऱ्यासह ठिकठिकाणी ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा, नेमका इतिहास काय?

महाराष्ट्रात 2017 पासून राज्यभरात 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील आताचं प्रतापसिंह हायस्कूल म्हणजेच तत्कालीन गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रवेश घेतला होता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन साताऱ्यासह ठिकठिकाणी 'विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा, नेमका इतिहास काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 6:58 PM

सातारा: महाराष्ट्रात 2017 पासून राज्यभरात 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील आताचं प्रतापसिंह हायस्कूल म्हणजेच तत्कालीन गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रवेश घेतला होता. हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रतापसिंह हायस्कूल, सातारा ही शाळा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते. या शाळेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संही असलेलं रजिस्टर जपून ठेवलंय. दरवर्षी इथं शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात येतो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिवसाचा इतिहास

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील तेंव्हाचे गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल सातारामध्ये (आताचे प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा चौकाजवळ) या शाळेतील इंग्रजी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत ते 07 नोव्हेंबर 1900 ते 1904 पर्यंत म्हणजेच चौथी इंग्रजीपर्यंत येथेच शिकले. या शाळेच्या रजिस्टरच्या अनुक्रमांक 1914 वर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असून या समोर भिवराव रामजी आंबेडकर अशी सही आहे. 1900 ते 1904 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण फी त्यांच्या वडिलांनी भरली होती. रजिस्टरवर कोणतीही फी बाकी नाही, असा उल्लेख देखील आढळतो. प्रतापसिंह हायस्कूल या शाळेनं हा ऐतिहासिक दस्तऐवज अभिमानाने जतन व संरक्षण करून ठेवला आहे. साताऱ्याला आणि प्रतापसिंह हायस्कूलला भेट देणाऱ्या नागरिकांना हा ठेवा पाहायला मिळतो.

Dr Babasaheb Ambedkar School Register photo

शाळेतील रजिस्टर

शिक्षणासाठी साताऱ्यात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कुटुंब 1896 साली साताऱ्यात दाखलं झालं होतं. सातारा येथील कँम्प स्कूलमध्ये शिकल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर सातारा हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900 मध्ये इंग्रजीच्या पहिल्या इयत्तेत प्रवेश झाला. 1904 मध्ये पुढील शिक्षणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला काढण्यात आला.

Pratapsingh high school alumni board 12

प्रतापसिंह हायस्कूलमधील माजी विद्यार्थी फलकावर चौथ्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे

2017 पासून शाळा प्रवेश राज्य पातळीवर सुरु

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला माननाऱ्या साताऱ्यातील कार्यकर्त्यांनी शाळा प्रवेश दिन साजरा करण्यास सुरुवात केली. साताऱ्यातील जिल्हा परिषद प्रशासन, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा कार्यकर्त्यांनी सुरु ठेवला होता. अखेर महाराष्ट्र शासनानं शाळा प्रवेश दिन 2017 सालापासून दरवर्षी 07 नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिवस” म्हणून घोषित केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे म्हणून, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी, यासाठी शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन साजरा करण्याचे आदेश दिले.

Satara Student day

साताऱ्यात विद्यार्थी दिवस साजरा

आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा द्यावा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेती संशोधन केंद्र व्हावे. प्रतापसिंह हायस्कूलला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही शाळा चालविण्यात यावी, अशी मागणी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

इतर बातम्या

TV9 Vishesh​ | भारतीय संविधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला, ‘यांच्या’ सरकारकडून झालेली घोषणा

Babasaheb Ambedkar School admission day in Satara Highschool celebrated as student day today in Maharashtra know history about all details

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.