आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं? बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं?
पर्यावरणाच्या बाबतीत झाडं, फुलं , पानं फळ यांची आपल्यापेक्षा जास्त माहिती आदित्य ठाकरे यांना आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. पर्यावरणाचा विषय आहे म्हणल्यावर त्यांना बोलावलं पाहिजे म्हटलं आणि ते यायला तयार झाले, असंही थोरात म्हणाले.
अहमदगर : संगमनेरमधील दंडकारण्य अभियान आनंद मेळाव्यानिम्मित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांचं कौतुकास्पद आहे. ते दोघे राज्याचं नेतृत्त्व करतात तसंच देशाचंही नेतृत्त्व करतील, अशा शब्दात दोन्ही युवा नेत्यांचं कौतुक बाळासाहेब थोरात केलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे यांना पर्यावरण खातं कसं मिळालं यासंदर्भात माहिती देखील दिली.
आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं?
महाराष्ट्राचं नेतृत्त्व करायचं म्हणजे राज्याच्या ग्रामीण भागाची, तिथल्या नव्या प्रयोगांची ओळख असली पाहिजे म्हणून आदित्य ठाकरेंशींशी चर्चा करायची होती. आदित्य ठाकरेंना कोणतं खातं पाहिजे विचारलं होतं, तेव्हा त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन खातं घेतो, असं सांगितलं. मुंबई पाहायची म्हणजे काय करायचं?, असा प्रश्न होता. आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेचं पर्यटन त्यांनी सुरु केलं. रोजगार आणि आर्थिक उत्पन्न आहे.पर्यावरणाच्या बाबतीत झाडं, फुलं , पानं फळ यांची आपल्यापेक्षा जास्त माहिती आदित्य ठाकरे यांना आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. पर्यावरणाचा विषय आहे म्हणल्यावर त्यांना बोलावलं पाहिजे म्हटलं आणि ते यायला तयार झाले, असंही थोरात म्हणाले.
विश्वजीत कदम आणि आदित्य ठाकरे देशपातळीवर काम करतील
पंतगराव कदम यांच्या अचानक जाण्यानं विश्वजीत कदम यांच्यावर जबाबदारी आली. सुरुवातीला जरा काळजी वाटली , परंतु विश्वजीत कदम यांनी निवडणूक जिंकल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही, असं वाटल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांना पुढील काळात देशपातळीवर काम करण्याची जबाबदारी पडेल. त्यावेळी देखील ते चांगली जबाबदारी पाडतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. दंडकारण्य अभियानाचं आता सोळावं वर्ष आहे. 5 वर्षानंतर आपण याच लावलेल्या झाडाखाली कार्यक्रम घेऊ, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. हर्मन हिल ही व्यवस्था करतोय, हे सोप कामं नव्हतं, 50 एकरावर आपण 157 प्रकारची झाडं लावली आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
उद्धव ठाकरे सर्वांना समजावून घेतात
महाविकास आघाडी सरकारचं काम चागलं सुरु आहे त्याला उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व कारणीभूत आहे. उद्धव ठाकरे सर्वांना समजावून घेतात, सगळ्यांना सोबत घेऊन काम करतात. आमचं सरकार आलं, सात जणांचा शपथविधी झाला तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय कर्जमुक्ती मिळावी यासाठी काम केलं. त्या अगोदर शेतकऱ्यांना अनेक अर्ज भरावे लागत होते.
इतर बातम्या:
आर्यन खानला 25 दिवस कोठडीत का ठेवलं?, आई म्हणून खूप वाईट वाटतं: सुप्रिया सुळे
चंद्रकांत पाटील म्हणाले ‘असे नेते आमच्या खिशात’; आता नवाब मलिक म्हणतात, ‘मी वाट पाहतोय’!
Balasaheb Thorat Said Aaditya Thackeray choose Environment and Tourism Ministry