Beed Lockdown : बीडमध्ये दहा दिवस कडक लॉकडाऊन वाढवला, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज मध्यरात्री पासून पुढील दहा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे. Beed district Lockdown

Beed Lockdown : बीडमध्ये दहा दिवस कडक लॉकडाऊन वाढवला, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 2:56 PM

बीड: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज मध्यरात्री पासून पुढील दहा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे. या लॉकडाऊनला परळीमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून व्यापाऱ्यांनी बाजार पेठा कडकडीत बंद ठेवल्या आहेत. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, वैद्यनाथ मंदिर हे नेहमी गजबाजणारे ठिकाण निर्मनुष्य झाले आहेत. (Beed collector Ravindra Jagtap imposed Lockdown in Beed district all institutions hotels restaurants general stores will be closed excluding essential services)

कोरोना रुग्णांची संख्या दरदिवशी हजारांच्या घरात

शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून चौकशी केली जातेय. जिल्ह्यात दररोज कोरोना ग्रस्तांचा आकडा हजारांची संख्या ओलांडत आहे, त्यामुळे जिल्हाधिका- यांनी कडक लॉकडाऊन लावला आहे. या मध्ये वैद्यकीय सेवा आणि सकाळी 7 ते 11 यावेळेत दूध विक्रीस परवानगी असून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर परळीत काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे.

12 मे रोजी लॉकडाऊनमध्ये वाढ

बीड जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन 12 मे रात्री 12 पासून ते 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. नागरिकांना बाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवल्या जातील. भाजीपाला विक्रीसाठी सकाळी 7 ते 11ची वेळ सकाळी 10 ते 12 दरम्यान बँकेचे व्यवहार सुरु राहतील, असे नियम लागू करण्यात आले होते. हेच नियम पुढील दहा दिवसांसाठी लागू असतील. सकाळी ठराविक वेळेत फिरत्या भाजीपाला विक्रीला परवानगी आहे. बँक सकाळी 10 ते 12 पर्यंत सुरू असतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कडकडीत बंद राहील. बीडमध्ये शनिवारी 1102 कोरोना रुग्ण आढळले होते.

जिल्ह्यात लॉकडाऊन वाढण्याची कारणे:

>> बाजारपेठेमध्ये वेळोवेळी सूचना करूनही नागरिक ऐकत नसल्यामुळे आणि सूचनांचे पालन करत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

>> जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची तारांबळ कमी व्हावी. तसंच ज्यांना उपचाराची खरी गरज आहेत त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय.

>> गेल्या महिनाभरात प्रत्येक दिवशी हजारहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

> बीडसह अन्य शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत होती. मात्र, आता गावखेड्यांमध्येही रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, 12 मे पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा

Weather Alert | विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापुरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; पुढील 5 दिवस महत्त्वाचे

(Beed collector Ravindra Jagtap imposed Lockdown in Beed district all institutions hotels restaurants general stores will be closed excluding essential services)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.