भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे थोरले बंधू ब्रम्हानंद पडळकरांच्या गाडीला अपघात
कार्यकर्त्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा समोरासमोर अपघात झाला. अपघाताचे वृ्त्त कळताच आमदार गोपीचंद पडळकर हे आपला सातारा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले आहेत.
सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे थोरले बंधू ब्रम्हानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांच्या गाडीला अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकरांसह तिघेजण जखमी आहेत. तसेच छोटा हत्तीचा चालकही गंभीर जखमी आहे. विटा-कुंडल रोडवर छोटा हत्ती गाडी आणि ब्रम्हानंद पडळकरांच्या गाडीमध्ये समोरासमोर धडक झाली. ब्रम्हानंद पडळकर हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर याचे थोरले बंधू आहेत आणि जिल्हापरिषद सदस्य आहेत. जखमींना विटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार्यकर्त्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा समोरासमोर अपघात झाला. (BJP MLA Gopichand Padalkars elder brother Bramhanand Padalkars car crashed)
ब्रम्हानंद पडळकर यांच्या पायाला आणि गुडघ्याला मार
अपघाताचे वृ्त्त कळताच आमदार गोपीचंद पडळकर हे आपला सातारा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी विटा स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. ब्रम्हानंद पडळकर यांच्या पायाला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ब्रम्हानंद पडळकर यांनी पुढील उपचारासाठी विटा येथून सांगली येथे आणण्यात येत आहे. दरम्यान, अपघात नेमका कसा झाला ? याबाबत पोलिस सखोल तपास करीत आहे. तपासानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होईल. (BJP MLA Gopichand Padalkars elder brother Bramhanand Padalkars car crashed)
इतर बातम्या
Kalyan Murder : आधी महिलेची हत्या केली, मग थेट आधारवाडी जेलमध्ये पोहचला; पोलिसही चक्रावले !