Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या

आरोपी प्रियकर अभिषेक शहा हा बुधवारी दुपारी 2.30 च्या सुमारास आपल्या अल्पवयीन प्रेयसीला घेऊन कळंबच्या हर्षद फार्म हाऊस येथे आला होता. काही वेळाने तो जेवण आणण्यासाठी बाहेर गेला मात्र परतलाच नाही. लॉज मालकाने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा त्याची प्रेयसी मृतावस्थेत पडली होती.

Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या
नालासोपाऱ्यात प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 4:57 PM

नालासोपारा : नालासोपारा कळंब समुद्र किनाऱ्यावरील एका लॉजमध्ये अल्पवयीन प्रेयसीची गळा आवळून हत्या (Murder) करत प्रियकराने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने बोरीवली येथे रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या (Suicide) केली. अभिषेक शहा असे प्रियकराचे नाव आहे. नालासोपारा पश्चिमेच्या कळंब येथील हर्षद फार्म हाऊस या लॉजमध्ये बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हत्या आणि आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने घडली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अर्नाळा पोलिस याबाबत सखोल चौकशी करत आहेत. (Boyfriend commits suicide after killing girlfriend in Nalasopara)

प्रेयसीची हत्या केल्यानंतर स्वतः रेल्वेखाली उडी घेतली

आरोपी प्रियकर अभिषेक शहा हा बुधवारी दुपारी 2.30 च्या सुमारास आपल्या अल्पवयीन प्रेयसीला घेऊन कळंबच्या हर्षद फार्म हाऊस येथे आला होता. काही वेळाने तो जेवण आणण्यासाठी बाहेर गेला मात्र परतलाच नाही. लॉज मालकाने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा त्याची प्रेयसी मृतावस्थेत पडली होती. आरोपी अभिषेकने गळा आवळून तिची हत्या करून फरार झाल्याचे स्पष्ट होताच लॉज मालकाने अर्नाळा सागरी पोलिसांनी याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथक रवाना करण्यात आली. शोध घेत असताना फरार प्रियकर आरोपीने बोरिवली रेल्वे स्थानकात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे उघड झाले.

अश्लील फोटोच्या आधारे प्रेयसीला करायचा ब्लॅकमेल

आरोपी प्रियकर अभिषेक त्याच्या प्रेयसीला अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत पैशाची मागणी करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रेयसीने मंगळवारी घरातून 15 हजार रुपये घेतले होते आणि त्यानंतर हे जोडपे लॉजवर आले होते. पण लॉजवर येऊन नेमके काय झाले की प्रेयसीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केली, हे मात्र स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Boyfriend commits suicide after killing girlfriend in Nalasopara)

इतर बातम्या

Wardha Crime | वर्ध्यात ऐन विशीत, गुन्हेगारीच्या कुशीत! कारागृहात 25 टक्के बंदिवान 20 ते 35 वयोगटातील

Sindhudurg VIDEO | पाणी प्रश्नी आवाज उठवल्याचा राग, सिंधुदुर्गात ग्रामस्थाला सरपंचाची मारहाण

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.