निलेश लंके काका, तुमच्यामुळे माझी कोरोनाची भीती गेली, बुलडाण्याच्या बालिकेचा कोव्हिड सेंटरमध्ये वाढदिवस

निलेश लंके काका हे कसं काय करतात? ते तिथेचे राहतात, झोपतात, त्यांना भीती नाही वाटत का? असे प्रश्न सृष्टी कोल्हे नेहमीच वडिलांना विचारत असायची. (Buldana Birthday COVID Centre Nilesh Lanke)

निलेश लंके काका, तुमच्यामुळे माझी कोरोनाची भीती गेली, बुलडाण्याच्या बालिकेचा कोव्हिड सेंटरमध्ये वाढदिवस
सृष्टी कोल्हे आणि निलेश लंके
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 12:37 PM

बुलडाणा : अहमदनगरमधील पारनेर विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनी कोरोनाग्रस्तांसाठी केलेले कार्य सध्या महाराष्ट्रभर कौतुकाचा विषय ठरत आहेत. त्यांनी सुरु केलेल्या कोव्हिड सेंटरची अनेकांना भुरळ पडली आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्यात मोताळा शहरात राहणाऱ्या 13 वर्षांच्या बालिकेनेही निलेश लंके यांच्याकडून प्रेरणा घेतली. खरबूज कापून तिने आपला वाढदिवस कोव्हिड सेंटरमध्ये साजरा केला. (Buldana Girl Celebrates Birthday at COVID Centre inspiring from NCP MLA Nilesh Lanke)

सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे लहान मुलंही टीव्हीसमोर बसून असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके यांच्या कार्याविषयीच्या बातम्या टीव्हीवर झळकत आहेत. त्या बातम्या मोताळा शहरात राहणाऱ्या 13 वर्षांच्या सृष्टी कोल्हे हिने टीव्ही आणि वडिलांच्या मोबाईलवर पाहिल्या.

कोव्हिड सेंटरमध्ये सृष्टीचा वाढदिवस

अनेक जण कोरोना रुग्णांच्या जवळ येण्यासाठी घाबरतात किंवा स्वतःचे आई-वडील, नातेवाईक यांनाही जवळ करत नाहीत. मात्र निलेश लंके काका हे कसं काय करतात? ते तिथेचे राहतात, झोपतात, त्यांना भीती नाही वाटत का? असे प्रश्न ती नेहमीच वडिलांना विचारत असायची. लंके काका यांची प्रेरणा घेऊन सृष्टीच्या मनात असलेली कोरोनाची भीती निघून गेली. तिनेही आपला वाढदिवस कोरोना सेंटरमध्ये साजरा करण्याचे ठरवले. रुग्णांना फळ वाटप करत सृष्टीने कोरोना सेंटरमध्ये वाढदिवस साजरा केला

निलेश लंके यांचं डोंगराएवढं काम

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खिशात एक रुपयाही नसताना, कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना तब्बल 1100 बेडचे कोविड सेंटर उभारण्याची किमया केलीये. सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेतलेले निलेश लंके हे लोकवर्गणीतून आमदार झाले. त्यांच्यात लहानपणापासूनच समाजसेवेची आवड, इतरांना नेहमी मदत करण्याची वृत्ती आहे. हे सर्व काम करत असताना ते ग्रामपंचायतमध्ये सरपंच झाले आणि थेट आमदारकीपर्यंत त्यांनी मजल मारली. मात्र, हे शक्य झालं त्यांच्या इच्छाशक्तीमुळे. (Buldana Birthday COVID Centre Nilesh Lanke)

पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या :

VIDEO | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…

निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंकडून कौतुक

माणुसकीचं नातं कसं असावं हे निलेश लंकेंनी दाखवलं; कोविड सेंटरची व्यवस्था पाहून जयंत पाटील भावूक

(Buldana Girl Celebrates Birthday at COVID Centre inspiring from NCP MLA Nilesh Lanke)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.