Leopard Attack | अंगणात खेळणाऱ्या चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला, आईने काठीने लावलं पळवून

जखमी अवस्थेतील आरक्षा जगजीवन पोप्पलवार हिला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या वन परिक्षेत्राधिकारी आणि पाच अन्य कर्मचाऱ्यांना एका घरात डांबले.

Leopard Attack | अंगणात खेळणाऱ्या चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला, आईने काठीने लावलं पळवून
चंद्रपुरात बिबट्याचा हल्लाImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 9:40 AM

चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत (Chandrapur) दुर्गापूर येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत (Leopard Attack) पाहायला मिळत आहे. वॉर्ड क्र 1 मध्ये अंगणात खेळत असलेल्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने झेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र माऊलीच्या प्रसंगावधानाने चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. समोर बिबट्याला पाहताच मुलीच्या आईने काठीने बिबट्याचा प्रतिकार केला. जखमी अवस्थेतील चिमुकल्या मुलीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर येथे वॉर्ड क्र 1 मध्ये अंगणात खेळत असलेल्या लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केला. मात्र मुलीच्या आईने समयसूचकता दाखवल्यामुळे तिचे प्राण बचावले. आरक्षा जगजीवन पोप्पलवार असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन वर्षीय मुलीचे नाव आहे.

ग्रामस्थांचा संताप, वन कर्मचाऱ्यांना कोंडलं

जखमी अवस्थेतील आरक्षा जगजीवन पोप्पलवार हिला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या वन परिक्षेत्राधिकारी आणि पाच अन्य कर्मचाऱ्यांना एका घरात डांबले.

हे सुद्धा वाचा

हल्लेखोर वाघ -बिबटे यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय या अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. स्थानिक नागरिकांच्या संतप्त भूमिकेमुळे दुर्गापूर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलीस- वन विभागाचे अधिकारी- महसुली अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

अखेर जवळपास 5 तासांनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनविभागाच्या 10 कर्मचाऱ्यांची ग्रामस्थांनी सुटका केली. हल्ला करणाऱ्या बिबट्याला मारण्याचे चंद्रपूर वन वृत्त कार्यालयाने आदेश दिल्यावर कर्मचाऱ्यांची सुटका झाली. वन विभागाने तातडीने बिबट्याला मारण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

पुण्यात दोन महिलांवर दोन बिबट्यांचे हल्ले

दुसरीकडे, दोन महिलांवर दोन बिबट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना पुण्याच्या खेड तालुक्यातील रेटवडी येथे उघडकीस आल्या आहेत.  मागील दीड महिन्यात बिबट्याचा हल्ला होण्याची गावात ही चौथी घटना आहे. पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्याने वन्यप्राणी पाणी आणि भक्षाच्या शोधात मानवी वस्तीत येताना दिसत आहेत. महिलांचे डोके, तोंडावर बिबट्याने पंजा मारला आणि चावा घेतल्याने दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अरुणा संजय भालेकर आणि रिजवना अब्दुल पठाण ह्या गंभीर जखमी महिलांची नावे आहेत. खोलवर जखमा होऊन रक्तस्राव झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रेटवडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.