6 वर्षांची आराध्या शाळेत जात होती; भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून निर्माण केली दहशत

या हल्ल्यात तिच्या गालाला 12 टाके पडले आहेत. यामुळे कुटुंब दहशतीत आहे. सध्या या मुलीची शाळा सुरू आहेत. परीक्षांचे दिवस असताना हा तिच्या व कुटुंबासाठी अवघड प्रसंग ठरलाय.

6 वर्षांची आराध्या शाळेत जात होती; भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून निर्माण केली दहशत
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 10:28 AM

चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भटक्या कुत्र्याची दहशत आहे. 6 वर्षाच्या आराध्या मानकर या मुलीवर अचानक हल्ला केला. हल्ल्यात मुलीचा गालाचा तुकडा तोडला. मुलगी जबर जखमी झाली. 19 टाके लागल्याने उपचार घेत आहे. चंद्रपूर (Chandrapur Dogs) जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात सर्वोदय विद्यालय परिसरात 6 वर्षाच्या आराध्य मानकर या मुलीवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला (Dog Attack) केला. या हल्ल्यात तिच्या गालाचा लचका तोडला. हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झालाय. या हल्ल्यात तिच्या गालाला 12 टाके पडले आहेत. यामुळे कुटुंब दहशतीत आहे. सध्या या मुलीची शाळा सुरू आहेत. परीक्षांचे दिवस असताना हा तिच्या व कुटुंबासाठी अवघड प्रसंग ठरलाय.

नुकसानभरपाईची मागणी

भटक्या कुत्र्यांनी बल्लारपूर शहरातील नागरिक त्रस्त आहेत. एकट्याने शाळेत वा कुठल्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी या त्रासाबाबत नगर परिषदेला वारंवार तक्रारी केल्या. मात्र यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. या मुलीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी आराध्याच्या आईने केली आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओत नेमकं काय?

या व्हिडीओत एक मुलगी रस्त्याने जात आहे. अचानक कुत्रा येऊन तिच्यावर हल्ला चढवतो. तिच्या गालाचे लचके तोडतो. त्यामुळे ती मुलगी घाबरून पळून जाते. तेवढ्यात तिची आई धावत येते. बाजूबाजूचे लोक येतात. तिला रुग्णालयान नेले जाते. कुत्र्याला हाकलले जाते.

कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्याचे काम नगर परिषदेचे आहे. पण, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात, असा नागरिकांचा आरोप आहे. आतातरी नगरपरिषदेने जागे व्हावे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....