Video: वाघ बैलाचा फडशा पाडत होता, लोक व्हिडीओ रेकॉर्ड करत होते! वाघ अंगावर आला असता म्हणजे…?

Chandrapur Tiger Attack on bull: वाघाच्या या हल्ल्यात बैलानं स्वतःला वाचवण्याचाही प्रयत्न केला. मात्र वाघाची पकड इतकी जबरदस्त होती, ही बैलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Video: वाघ बैलाचा फडशा पाडत होता, लोक व्हिडीओ रेकॉर्ड करत होते! वाघ अंगावर आला असता म्हणजे...?
वाघाच्या हल्ल्यात बैल ठारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 5:56 PM

चंद्रपूर : वाघानं बैलावर (Tiger attack on bull) हल्ला केला. हा हल्ला चंद्रपुरातील लोकांनी कॅमेऱ्यात कैद (Mobile Video) करण्यासाठी केलेली धावपळ हल्ल्यापेक्षाही थरारक आहे. बैलावर हल्ला करताना हाकेच्या अंतरावर असलेल्या वाघानं या माणसांवरही हल्ला केला असता, तर…? असा प्रश्न हा थरारक व्हिडीओ पाहून कुणालाही पडेल! लोकांनी केलेलं धाडस त्यांच्याच जीवावरही बेतू शकलं असतं, अशी परिस्थिती यावेळी निर्माण झाली होती. वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यात बैल ठार झाला आहे. हा थरारक हल्ला चंद्रपुरातील लोकांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवला. दरम्यान, बैल मारणाऱ्या वाघामुळे स्थानिक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चंद्रपुरातील वरोरा तालुक्यात (Varora Taluka, Chandrapur) ही थरकाप उडवणारी घटना समोर आली. स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. या हल्ल्यादरम्यान ऐकू येणारा गोंधळाचा आवाज थरकाप उडवणारा होता. वरोरा तालुक्यातील अर्जुनी या गावातील संभाजी येठे यांच्या बैलावर वाघानं हल्ला केला. या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला आहे.

अंगावर काटा आणणार Video

अर्जुनी येथील शेतशिवारात ही थरकाप उडवणारी घटना घडली. या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांचा बैल ठार झाल्यानं शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे. अर्जुनी गाव हे ताडोबा अंदारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येतं. आता शेतकऱ्यांनं वनविभागाकडे तातडीनं नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या धक्कादायक घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आलाय.

असा झाला हल्ला!

वाघानं बैलाची मान आपल्या जबड्यात पडकली होती. वाघाच्या या हल्ल्यात बैलानं स्वतःला वाचवण्याचाही प्रयत्न केला. मात्र वाघाची पकड इतकी जबरदस्त होती, ही बैलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. वाघानं केलेल्या या हल्ल्यादरम्यान, या गावातील स्थानिकही त्यावेळी तिथंच होते. बैलाला वाचवण्यासाठी आरडाओरडाही स्थानिक शेतकऱ्यांनी केला. मात्र या आरडाओरडा ऐकून वाघ स्थानिकांवरही धावून येण्याची भीती व्यक्त केली जात होती. सुदैवानं गावकऱ्यांना या वाघानं कोणताही हल्ला केला नाही. दरम्यान, वाघ आल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिकही सैरावैरा पळू लागले.

पाहा घटनेचा थरारक Video :

चंद्रपुरात वाघाचे हल्ले होणं, काही नवीन गोष्ट नाही. मात्र आता वाघाची नजर ही जवळच्या गावातील पाळीव जनावरांवही पडू लागली आहे. यामुळे शेतकरी धास्तावले असून वनविभागानं याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली जाते आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO: चंद्रपुरात वाघांच्या फोटोसाठी छायाचित्रकार सैराट, फोटो काढायची हौस बेतू शकते जीवावर, नियम धाब्यावर

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संबंध ठेवणाऱ्या नराधमला अटक

दरोडेखोराचा फिल्मी स्टाईल पाठलाग, जखमी होऊनही पोलिसाने गचांडी धरलीच, कसारा घाटात थरारनाट्य

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.