Virar Crime : विरारमध्ये लहान मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागरिकांकडून चोप

विरार पश्चिम पूनम नगर परिसरात प्रभात कॉम्प्लेक्स जवळ आज सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. एक तरुण एका लहान मुलीचा हात पकडून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी तात्काळ तरुणाला पकडून चोपून काढले. 

Virar Crime : विरारमध्ये लहान मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागरिकांकडून चोप
विरारमध्ये लहान मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागरिकांकडून चोपImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 9:37 PM

विरार : लहान मुलीचे अपहरण करणाऱ्या एका 18 वर्षाच्या तरुणाला पकडून नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना विरारमध्ये घडली आहे.  9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचे अपहरण (Kidnapping) करत असतानाच जागरूक नागरिकांनी तरुणाला पकडुन त्याला बेदम चोप (Beating) दिला, नंतर झाडाला बांधून, नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन हे अपहरण आहे की अन्य काही कारण आहे. याचा तपास करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अर्नाळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली आहे. (Citizens beat up youth for abducting minor girl in Virar)

विरार पश्चिम पूनम नगर परिसरात प्रभात कॉम्प्लेक्स जवळ आज सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. एक तरुण एका लहान मुलीचा हात पकडून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी तात्काळ तरुणाला पकडून चोपून काढले.  त्यानंतर अर्नाळा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिस आरोपीची सखोल चौकशी करीत आहेत.

भंडाऱ्यातही अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

शाळा सुटल्यानंतर ऑटोची वाट बघणाऱ्या अल्पवयीन मुलीला एकाने भुलथापा देत बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. ही बाब मुलीच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी पाठलाग करून मुलीला पळविणाऱ्या युवकाला वाटेत पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अनिकेत किशोर शहारे (20) आणि सूरज जिवतोडे (22) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही लाखनी येथील रहिवासी आहेत. (Citizens beat up youth for abducting minor girl in Virar)

इतर बातम्या

भरधाव BMW डिव्हायडर पार करत विरुद्ध दिशेला! डिव्हायडरवर उभ्या असलेल्या महिलेचं काय झालं? पाहा थरारक Video

Pune, IPL2022 : विराट कोहली, रोहित शर्माला भेटण्याचा मोह महागात, क्रिकेटप्रेमीवर गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.