दापोली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील निर्माणाधीन बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. परवानगी न घेताच हा बंगला बांधण्यात येत असल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आज या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. नार्वेकर यांच्या बंगल्यावरील कारवाई हा मुख्यमंत्र्यांसाठी मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे. (CM Uddhav Thackeray’s Secretary Milind Narvekar’s illegal Bungalow demolished)
मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून हा बंगला बांधण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यता आले. जेसीबी मशीन लावून हा बंगला तोडण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी या तोडक कारवाईचा व्हिडीओ ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच हा बंगला किती प्रमाणात तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जाणार आहेत.
दरम्यान, आज नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी तसं ट्विटच केलं आहे.
नार्वेकर यांच्या बंगल्याप्रकरणी सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर 72 गुंठा जागा घेतली, त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठं उत्खननही चाललं आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.
एका बाजूला कोव्हिडमुळे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्याच वेळेला शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात भव्य रिसॉर्ट आणि बंगले बांधत आहेत. असे असताना सरकार मात्र या दोघांना पाठीशी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याला या प्रकरणात लक्ष्य केल्याने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. (CM Uddhav Thackeray’s Secretary Milind Narvekar’s illegal Bungalow demolished)
करून दाखविले !!!!
मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले
पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा
उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार pic.twitter.com/azpHTiFHlQ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 22, 2021
संबंधित बातम्या:
दापोलीच्या समुद्र किनारी परवानगी न घेता मिलिंद नार्वेकरांचा बंगला, किरीट सोमय्यांचा आरोप
अनिल परबांच्या अडचणी वाढणार? सोमय्यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पथकाकडून परबांच्या रिसॉर्टची पाहणी
‘ही कमाल फक्त उद्धव ठाकरेच करु शकतात!’ जमीन खरेदी प्रकरणात सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना टोला
(CM Uddhav Thackeray’s Secretary Milind Narvekar’s illegal Bungalow demolished)