Gadchiroli Nagar Panchayat | गडचिरोलीतील नऊपैकी चार नगरपंचायतींवर काँग्रेसचे नगराध्यक्ष, दोन ठिकाणी शिवसेनेची सत्ता

गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतींपैकी चार नगरपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्यात. तर दोन नगरपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्यात. भाजपला फक्त एका नगरपंचायतीवर सत्ता हस्तगत करता आली. स्थानिक पक्ष असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघटनेने दोन नगरपंचायतींवर सत्ता खेचून आणली.

Gadchiroli Nagar Panchayat | गडचिरोलीतील नऊपैकी चार नगरपंचायतींवर काँग्रेसचे नगराध्यक्ष, दोन ठिकाणी शिवसेनेची सत्ता
सिरोंचा नगरपंचायतीचे किंग मेकर बबलू पाशा व नगरसेवक.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 2:34 PM

गडचिरोली : जिल्ह्यात या अगोदर भाजपकडे पाच नगरपंचायती होत्या. अशा भाजपला एक नगरपंचायतीवर ताबा मिळविता आला. आदिवासी विद्यार्थी संघटनेने पहिल्यांदाच अहेरी व सिरोंचा नगरपंचायतीत आपली सत्ता स्थापन केली. सिरोंचा नगरपंचायत साधारण व्यक्तींना राजकारणात आणले. दहा नगरसेवकांना जिंकण्यासाठी व सिरोंचा नगरपंचायतच्या (Sironcha Nagar Panchayat) उपाध्यक्ष निवडून आलेल्या बबलु पाशा (Bablu Pasha) यांची किंगमेकरची भूमिका होती. कुरखेडा नगरपंचायत शिवसेनेने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. कुरखेडा नगरपंचायत मागील पाच वर्षांत अडीच वर्षे शिवसेनेकडे सत्ता होती. अहेरी नगरपंचायत भाजप पक्षाला पराभव करून शिवसेनेने आदिवासी विद्यार्थी संघटना (Tribal Students Association) स्थानिक असलेल्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केली. अहेरी नगरपंचायतीत मागील पाच वर्षे भाजप सत्तेत होती. अहेरी या ठिकाणी पहिल्यांदा शिवसेनेने सत्ता स्थापन केली. मुलचेरा या ठिकाणी शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी चित्र स्पष्ट आहेत. मुलचेरा या ठिकाणी मागील पाच वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती.

शिवसेनेला पालकमंत्री पदाचा फायदा

आता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याचा पुरेपूर फायदा घेत शिवसेनेने यावेळी दोन नगरपंचायतींमध्ये सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले. एटापल्ली नगरपंचायत काही अपक्ष नगरसेवकांना घेऊन काँग्रेस येथे सत्ता स्थापन केली. या ठिकाणी मागील पाच वर्षात राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांनी सत्ता सांभाळली होती. गडचिरोली जिल्ह्यातील नऊ पैकी एकही नगरपंचायत भाजपच्या खात्यात जाणार नाही असे चित्र गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

भाजपला पाचऐवजी एका जागेवर मानावे लागले समाधान

गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडे तीन नगरपंचायती आलेल्या आहेत. धानोरा, एटापल्ली, चामोर्शी या तीन नगरपंचायतींमध्ये एकतर्फी सत्ता काँग्रेस पक्षाने हस्तगत केली. धानोरा नगरपंचायतीत एकतर्फी सत्ता काँग्रेसने स्थापन केली. धानोरा येथे मागील पाच वर्षात भाजपची सत्ता होती. भाजपला यावेळी येथे पराभव स्वीकारावा लागला. चामोर्शी नगरपंचायत काँग्रेसने सत्ता स्थापन केली. या ठिकाणीही मागील पाच वर्षात भाजपने सत्ता सांभाळली होती. पण येथे ही भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला.

Nagpur Corona | कोरोनाचे निर्बंध धाब्यावर, कोचिंग क्लासेस सुरू, मनपाने काय केली कारवाई?

Nagpur | आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेचा समारोप; भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी

आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू काय करतो माहीत आहे का?, वाचा नागपुरातील दिव्यांग खेळाडूचा जीवन संघर्ष

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.