सांगलीतील मंगलमूर्ती कॉलनीच्या मशीद बांधकामाचा वाद; स्थानिक नागरिकांची भूमिका काय?

एक महिन्यापूर्वी याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गटाकडून परस्पर तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले.

सांगलीतील मंगलमूर्ती कॉलनीच्या मशीद बांधकामाचा वाद; स्थानिक नागरिकांची भूमिका काय?
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 7:36 AM

सांगली : मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगलीच्या कुपवाडनजीक अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. एक महिन्यापूर्वी याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गटाकडून परस्पर तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. सांगलीच्या कुपवाड रोडवरील सूतगिरणी नजीक मंगलमूर्ती कॉलनी या ठिकाणी एका मशिदीच्या बांधकामावरून 26 फेब्रुवारी रोजी दोन गटांमध्ये मारामारीचे प्रकार घडला.

याठिकाणी मनपा शाळेचे आरक्षण

या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी या मशिदीला विरोध केला. या ठिकाणी या दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. मशीद ही बेकायदेशीर बांधण्यात येत आहे. कोणतेही परवानगी नाही. या ठिकाणी महापालिकेच्या शाळेचं आरक्षण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे.

हे सुद्धा वाचा

बहुसंख्ये हिंदू असल्याने मशीद नको

या ठिकाणी बहुसंख्य हिंदू समाज असल्याने मशिद नको. अशी भूमिका स्थानिक नागरिक श्रीकांत कोष्टी आणि संतोष कलगुटगी यांनी मांडली आहे. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाकडून परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आल्या. त्यानुसार 15 जणांवर गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस म्हणतात, शांतता आहे

सध्या याठिकाणी शांततापूर्ण वातावरण आहे. असं संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी सांगितलं. या परिसरात असणाऱ्या वादग्रस्त मशीदच्या जागेत पत्र्याचे मोठे कंपाउंड मारण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी या जागेला कुलूप देखील लावण्यात आले आहे. आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत.

पोलीस निरीक्षक म्हणाले, २५ फेब्रुवारी रोजी वाद झाला होता. मारामारी झाली होती. दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत. एका गुन्ह्यातील ११ आरोप आणि दुसऱ्या गुन्ह्यातील चार आरोपी यांच्यावर अटकेची आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.