पंढरपुरात निवडणुकीमुळे कोरोनाचा उद्रेक, ड्युरीवरील शिक्षकासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

देशात कोरोनानं थैमान घातलेलं असतानाही निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोट निवडणूक घोषित केली. त्याचे परिणाम आता दोन्ही तालुक्यातील सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत.

पंढरपुरात निवडणुकीमुळे कोरोनाचा उद्रेक, ड्युरीवरील शिक्षकासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 5:22 PM

सोलापूर : देशात कोरोनानं थैमान घातलेलं असतानाही निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोट निवडणूक घोषित केली. त्याचे परिणाम आता दोन्ही तालुक्यातील सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. येथील नागरिकांना ही निवडणूक भलतीच महागात पडली आहे. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता निवडणूक कर्तव्य बजावलेल्या एका शिक्षकासह त्यांच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. या निवडणुकीत नेमणूक झालेल्या शिक्षकासह संपूर्ण कुटुंबाला कोरोना संसर्ग झाला. यात या शिक्षकासह त्यांचे वडील, आई आणि मावशीलाही जीव गमवावा लागलाय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय (Corona infection increases in Pandharpur Mangalvedha after by poll 4 dead in family).

पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत सुरुवातीपासूनच आश्चर्य व्यक्त होत राहिलंय. अनेकांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर संतापही व्यक्त केला. या निवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. निवडणुकीनंतर आता ही भीती सत्यात उतरलीय.

कोरोनाचं थैमान, ड्युटीवर असलेल्या शिक्षकासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात रोज कोरोना बाधितांचे आकडे बेसुमार वाढत आहेत. यात रोज अनेकांचे जीव जात आहेत. कोरोनाचे नवे रुग्ण दोन्ही तालुक्यात वाढत असताना सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणूक कर्तव्यावर गेलेल्या शिक्षकाला कोरोनाची बाधा झाली. इतकंच नाही तर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही दगावल्या.

“भाऊ डॉक्टर, उपचारासाठी थेट मुंबईत हलवलं, तरीही शिक्षकाचा कोरोनाने मृत्यू”

सांगोला तालुक्यातील घेरडी गावाचे शिक्षक प्रमोद माने यांची निवडणूक कामावर नेमणूक झाली होती. कुठल्याही परिस्थितीत हे काम टाळता येत नाही. निवडणुकीचे काम संपवून घरी गेल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी सांगोला येथे दाखल केले, पण त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डॉक्टर असलेल्या त्यांच्या बंधूनी त्यांना मुंबईला हलवलं, पण अखेर प्रमोद माने यांचा कोरोनाने बळी घेतला.

“निवडणुकीनंतर कोरोनानं एक कुटुंबच उद्ध्वस्त केलं”

कोरोनाने निवडणूक कामावर असलेल्या प्रमोद माने यांचा बळी घेतल्यानंतर हे दृष्टचक्र इथंच थांबलं नाही. त्यांच्यानंतर त्यांचे वडील वसंतराव माने, आई शशिकला माने आणि मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. प्रमोद माने यांच्या मुलाने आणि पत्नीने मात्र कोरोनाशी यशस्वी झुंज दिली आणि बरे झाले.

निवडणुकीची शिक्षा पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांना, आयोगानं काय साध्य केलं?

या पोट निवडणुकीने पंढरपुरातील एक कुटुंबच उद्ध्वस्त केलंय. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका या निवडणुकीची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी आणि निवडणूक आयोगाने या निवडणुकीतून नक्की काय साधलं असाच सवाल आता उपस्थित झाला आहे.

हेही वाचा :

Abhijit Bichukale | अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट पुन्हा जप्त, पंढरपूर पोटनिवडणुकीत ‘नोटा’लाही अधिक मतं

Video: आवताडेची लीड वाढली आणि फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल !

पेपर टाकणारा तरुण इंजिनिअर झाला, लग्नही ठरलं, कोरोनाने भरल्या ताटावरुन 24 वर्षांच्या शुभमला नेलं

व्हिडीओ पाहा :

Corona infection increases in Pandharpur Mangalvedha after by poll 4 dead in family

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.