Coronavirus: रत्नागिरीत आठ दिवसांचा लॉकडाऊन फेल; कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये राज्यात दुसरा क्रमांक
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी रत्नागिरीत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊनही पाळण्यात आला होता. मात्र, त्याचा फारसा फायदा झालेला नाही. | Coronavirus
रत्नागिरी: एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थितीत मात्र अजूनही चिंताजनक आहे. जिल्ह्यात अजूनही मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोना (Coroanvirus) पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Coronavirus surges into Ratnagiri in Maharastra)
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी रत्नागिरीत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊनही पाळण्यात आला होता. मात्र, त्याचा फारसा फायदा झालेला नाही. रत्नागिरीत सध्याच्या घडीला कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 14.12 टक्के इतका आहे. त्यामुळे आता स्थानिक आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. गावागावात कोरोना पोहोचल्याने बाधितांची शोधमोहिम आरोग्य विभागाला हाती घ्यावी लागणार आहे.
काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे 10697 नवे रुग्ण
राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 10697 नव्या रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारपेक्षा ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे. यामुळे आजपर्यंत राज्यात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 58 लाख 98 हजार 550 इतकी झाली आहे. मात्र, त्याचवेळी यातले 56 लाख 31 हजार 767 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.48 टक्के इतका झाला आहे. तर 14910 रुग्णांना काल दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला.
कोल्हापुरातील परिस्थिती अद्यापही चिंताजनक; अजित पवार आढावा घेणार
सध्या राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडताना दिसत आहेत. लॉकडाऊन करुनही येथील परिस्थितीत विशेष फरक पडलेला नाही. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर राज्य सरकार काही मोठी पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.
संबंधित बातम्या:
वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार
Coronavirus: देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, 70 दिवसांच्या निचांकी पातळीवर
(Coronavirus surges into Ratnagiri in Maharastra)