Gadchiroli SUicide : पत्नीच्या निधनाची बातमी कळताच सीआरपीएफ जवानाची आत्महत्या

मयत जवान चंद्रभूषण जगत याच्या पत्नीने छत्तीसगड राज्यातील बिलासपुर कुकुर्दीकरा येथे आपल्या गावी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पत्नीच्या आत्महत्येची माहिती चंद्रभूषणला फोनवरुन कळविण्यात आली.

Gadchiroli SUicide : पत्नीच्या निधनाची बातमी कळताच सीआरपीएफ जवानाची आत्महत्या
प्रेमप्रकरणातील मारहाणीत तरुणाचा मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 12:28 AM

गडचिरोली : पत्नीच्या आत्महत्येचे वृत्त कळताच सीआरपीएफ जवाना (CRPF Jawan)ने स्वतःवर गोळी घालून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीत घडली आहे. चंद्रभूषण जगत असे आत्महत्या (Suicide) केलेल्या जवानाचे नाव आहे. जगत हा जवान गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत होता. केंद्रीय राखीव दलाच्या 113 क्रमांकाच्या बटालियन कॅम्पमध्ये चंद्रभूषण कार्यरत होता. मयत जवान हा छत्तीसगड राज्यातील बिलासपुर कुकुर्दीकरा येथील रहिवासी आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. (CRPF jawan commits suicide in gadchiroli after wife’s death)

पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळताच जवानाची आत्महत्या

मयत जवान चंद्रभूषण जगत याच्या पत्नीने छत्तीसगड राज्यातील बिलासपुर कुकुर्दीकरा येथे आपल्या गावी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पत्नीच्या आत्महत्येची माहिती चंद्रभूषणला फोनवरुन कळविण्यात आली. पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच गडचिरोलीतील धानोरा येथे कार्यरत असलेल्या चंद्रभूषणने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

बुलडाण्यात तलाठ्याची गळफास घेत आत्महत्या

बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला येथील रहिवासी तसेच भडगाव या ठिकाणी कार्यरत असलेल्या तलाठ्याने स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नारायण पाटीलबा देठे (55) असे आत्महत्या केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. त्‍यांनी आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. सकाळी पत्नी त्‍यांना शेतात बघण्यासाठी गेली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले आहे. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उतरवून पंचनामा केलाय. देठे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.

नागपुरात परम की दालच्या संचालकाची आत्महत्या

नागपुरातील फूड लव्हर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या परम की दालच्या संचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. सोनी भुपेंद्र राजपूत (36) असे आत्महत्या केलेल्या संचालकाचे नाव आहे. परम की दाल हे नागपूरच्या तरुणाईचं आकर्षण केंद्र होतं. सोनी यांची पत्नी आणि मुलगा पंजाबला गेले होते. त्यामुळे सोनी घरी एकटे होते. मात्र सोनी यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (CRPF jawan commits suicide in gadchiroli after wife’s death)

इतर बातम्या

Jayashree Patil : अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांचा सीबीआयने जबाब नोंदवला

Jammu-Kashmir : काश्मिर खोर्‍यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांची मोठी कारवाई

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.