खोपोलीच्या नाल्यात वाहून गेलेल्या ‘त्या’ चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, तीन दिवसांपासून सुरु होता शोध

खोपोलीतील क्रांतीनगर या झोपडपट्टी भागाला लागून असलेल्या नाल्यात वाहून गेलेल्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडले आहेत.

खोपोलीच्या नाल्यात वाहून गेलेल्या 'त्या' चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, तीन दिवसांपासून सुरु होता शोध
पाण्यात बुडालेल्या चिमुकल्यांचे मृतदेह सापडले आहेत.
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 10:02 PM

रायगड : खोपोलीतील क्रांतीनगर या झोपडपट्टी भागाला लागून असलेल्या नाल्यात वाहून गेलेल्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडले आहेत. मागील तीन दिवसांपासून या दोघांचा शोध सुरु होता. यातील दुसरा मृतदेह आज सापडला. निलम श्रीकांत हंचलीकर (7) आणि बाबू श्रीकांत हंचलीकर (5) हे भाऊ-बहीण नाल्यात वाहून गेले होते. यातील निलमचा मृतदेह काल (20 जुलै) सापडला होता. या घटनेमुळे खोपोली परिसरात शोककळा पसरलेली आहे. (dead bodies of Two children of Khopoli have been found who were drowned)

नेमकं काय घडलं होतं ?

मागील काही दिवासांमध्ये मुंबई, ठाणे, खोपेलीसह कोकण भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे. खोपोलीतील क्रांतीनगर या झोपडपट्टी भागाला लागून एक मोठा नाला आहे. या झोपडपट्टीतील एका महिलेच्या डोळ्यासमोर तिची लहान मुलं नाल्यात पडून वाहून गेली. 19 जुलै रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास ही घटना घडली होती. दोन्ही मुलं आईसोबत विसर्गासाठी गेली होती. आईने दोघांना घरी जाण्यास सांगितले होते. मात्र दोन्ही मुलं घरी न जाता सार्वजनिक शौचालयाशेजारी असलेल्या नाल्यात खेळत होती. मुलं घरी न आल्याचे आईला समजल्यानंतर तिने व तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली होती. परंतु त्यावेळी काही जणांनी सदर मुले नाल्यात पडताना पाहिली असल्याचे सांगितले होते. मात्र नाला दुथडी भरुन वाहत असल्यामुळे मुलं दिसेनाशी झाली होती.

तिसऱ्या दिवशी मुलचा मृतदेह सापडला

बुडालेल्या या दोन्ही चिमुकल्यांचा शोध मागील तीन दिवसांपासून सुरु होता. बचावपथक तसेच शोधपथकाला यामध्ये यश येत नव्हते. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वृषभ उर्फ बाबू श्रीकांत हचंलीकर याचा मृतदेह सापडला. तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी निलम श्रीकांत हचंलीकर हीचा मृतदेह सापडला होता.

पोलीस, संस्थेच्या प्रयत्नांना यश

दरम्यान या मुलांचा शोध घेण्यासाठी खोपोली पोलीस तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या सस्थेंच्या टीमने मोठी मेहनत घेतली. पोलीस तसेच संस्थेने संयुक्तपणे मुलांचे दोन्ही मृतदेह शोधले. ईवल्याशा भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे खोपोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

Mumbai Rains Live Update | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, महाबळेश्वरमध्ये वीजपुरवठा खंडित 

ATM मधून पैसे काढणे आणि डेबिट-क्रेडिट कार्डावरील शुल्कात लवकरच वाढ, जाणून घ्या RBI च्या सूचना

Maratha OBC Reservation : मराठा आरक्षणावरुन रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं, ओबीसी आरक्षणावरुनही टोला

(dead bodies of Two children of Khopoli have been found who were drowned)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.