कितीही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्षाला हरवू शकत नाही, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

कितीही वेली एकत्र आल्यात तरी वटवृक्षाला हरवू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं. उद्धव ठाकरे यांनी डायलॉगबाजी बंद करावी, असंही ते म्हणाले.

कितीही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्षाला हरवू शकत नाही, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 9:24 PM

विवेक गावंडे, प्रतिनिधी, अकोला : उद्धव ठाकरे यांनी वरळीतील मेळाव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. मणीपूर पेटत असताना तुम्ही तिथं जाऊन ते शांत करावं, असं आवाहन केलं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुम्ही मुकाबला करू शकत नाही. पाटण्यात मोदींना हरवण्यासाठी विरोधक एकत्र झालेत. त्यात आता उद्धव ठाकरे हेही पाटण्याला जाणार आहेत. कितीही वेली एकत्र आल्यात तरी वटवृक्षाला हरवू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं. उद्धव ठाकरे यांनी डायलॉगबाजी बंद करावी, असंही ते म्हणाले.

घरी बसणाऱ्यांना अमित शाह काय माहीत?

तुम्ही अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला करू शकत नाही. जे घरी बसतात त्यांना अमित शाह काय माहिती. जे घरात बसून राजकारण करतात. त्यांना नरेंद्र मोदी काय माहिती. पंतप्रधान मोदी यांनी या देशात गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हटलं

उद्धव ठाकरे यांचे सरकार घरी बसणार सरकार होतं. हे मी म्हणत नाही तर शरद पवार साहेबांनी नुकतंच आत्मचरित्र लिहिलं. ते असं म्हणाले आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षांमध्ये केवळ दोनच दिवस मंत्रालयात गेले. त्यामुळे आमचे नुकसान झालं. आता मी म्हटलं असतं गेले नाही तर म्हणाले असते बघा आमचा विरोध करतात. पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय. उद्धव ठाकरेंची राजकीय समझ थोडी कमी आहे. म्हणून 40 लोक निघून गेले, तरी त्यांना समजलं नाही. हे मी नाही म्हटलं हे शरद पवार साहेबांनी या ठिकाणी म्हटलं आहे.

हा काही योगायोग नाही

देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सरकार जनसामान्यांकरिता काम करते. पण काही लोकं यासाठी अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात. कोल्हापुरातील घटना हा योगायोग नाही. हा एक प्रयोग आहे. काही लोकं प्रयोग करून या ठिकाणी अशांतता झाली पाहिजे, असा प्रयत्न करताय. अचानकपणे काही लोक औरंगजेबाचा स्टेटस कसा ठेवायला लागले. अचानक औरंग्याच्या एवढ्या औलादी कुठून पैदा झाल्या, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

पश्चिम विदर्भ ओलीताखाली आणणार

अकोला येथे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तुम्हाला सांगतो हे आपले जिल्हे जे सातत्याने दुष्काळामध्ये जातात या जिल्ह्यांचं चित्र बदलण्यात येणार आहे. वैनगंगा नळगंगा प्रकल्प हा देखील अनेक करून दाखवू. वाहून जाणारा पाणीसाठा या ठिकाणी आणून हा सगळा भाग ओलिताखाली आणून हिरवा गार करू. अशा प्रकारचा पश्चिम विदर्भ हा तयार करण्याचा या ठिकाणी निर्धार आपण केलाय. कारण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मत दिलं. त्यामुळे हे काम करण्याची संधी मिळाली आहे.

Non Stop LIVE Update
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला.
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ.
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',.
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी.
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’.
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री.
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट.
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?.
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास..
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास...