“मुलगी पैदा झाली की, घर लखपती होणार”; देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठीच्या योजनांची माहिती सांगितली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून फक्त सत्ता उपभोगली नाही तर जनसामान्य माणसांना नवी ओळख निर्माण करण्याचं काम केले असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
नांदेड : गृहमंत्री अमित शाह यांची आज नांदेड शहरामध्ये जाहीर सभा झाली. त्यानिमित्ताने गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी भाजपच्या योजना जनसामान्यांच्या कशा फायद्याच्या आहेत. तेसुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. भाजप सत्तेत आल्यानंतर महिलांसाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती देताना महिलांसाठी कोणत्या योजना राबवल्या त्याचीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आल्यानंतर महिलांच्या विकासासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. तसेच महिलांसाठी बस प्रवासात पन्नास टक्के सूट देण्यात आल्याने राज्यातील अनेक महिलांना त्याचा त्यांना फायदा मिळाला आहे.
त्याच बरोबर आता ज्या घरात मुली जन्माला येणार आहेत, ते घर आता लखपती होणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावावर 5 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
त्याच बरोबर पहिल्या वर्गात गेल्यानंतर 5 हजार, सातवीमध्ये गेल्यानंतर 8 तर 18 व्यावर्षी मुलीला 75 हजार रुपये मिळणार असल्याचेही सांगत मुलगी जन्माला येणारे घर कसं लखपती होणार आहे हेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, महिला, नोकरदार, छोटे व्यावसायिक त्याचबरोबर बेरोजगार युवकांसाठी सरकारने आणलेल्या मुद्रा योजनेतून मिळालेल्या लाखो युवकांचे त्यांनी यावेळी उदाहरणही दिले आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून फक्त सत्ता उपभोगली नाही तर जनसामान्य माणसांना नवी ओळख निर्माण करण्याचं काम केले असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
मुलीच्या जन्मामुळे आता राज्यातील घर लखपती होणार असून या डबल इंजिन सरकाने राज्यातील कोट्यवधी जनतेला सुखी समाधानी करण्याचे काम केले आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.