रस्ते खराब, एसटी बस बंद, कसे जाणार शाळेत?; विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याचं दिवशी केले आंदोलन

काही भागात रस्ते खराब असल्याने गावापर्यंत एसटी बस येऊ शकली नाही. त्यामुळे पहिल्याचं दिवशी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले.

रस्ते खराब, एसटी बस बंद, कसे जाणार शाळेत?; विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याचं दिवशी केले आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 5:34 PM

गडचिरोली : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत्या ५ जुलैला येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनात गडचिरोली जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. विदर्भातील शाळांचा आज पहिला दिवस होता. काही भागात रस्ते खराब असल्याने गावापर्यंत एसटी बस येऊ शकली नाही. त्यामुळे पहिल्याचं दिवशी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. अहेरी तालुक्यातील अनेक भागात शालेय एसटी बस सुविधा बंद आहे. एसटी बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरले होते.

गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेला सुरजागड लोह खनिज वाहतुकीमुळे सध्या या भागात रस्ते खराब झालेत. त्यामुळे या रस्त्यांवरील एसटी बस सेवा बंद आहे. पहिल्या दिवशीच्या शाळकरी विद्यार्थ्यांना बस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आलापल्ली अहेरी राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने समर्थन देत राज्य सरकार आणि केंद्राच्या विरोधात नारेबाजी केली.

GADCHIROLI 2 N

शालेय एसटी बस सुरू करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

30 जूनपासून जिल्ह्यातील शालेय मान्सून सत्र सुरु झाले आहे. भाजप सरकार बेटी बचाव – बेटी पढावच्या गोष्टी करतात. मात्र त्याच मुलींना चांगले शिक्षण द्यायचे झाल्यास भाजप काढता पाय घेते. सुरजागड खदाणीत चालणाऱ्या जड वाहतुकीमुळे आष्टी आलापल्ली महामार्गाची दुरावस्था झाली, असा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला.

या महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाच्या बस पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सायकलने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

जिल्हात शिक्षणाचा स्तर वाढावा आणि जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा म्हणून काँग्रेस शासनाच्या काळात गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. याच विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाकरिता देशाच्या महामहीम राष्ट्रपती महोदय जिल्ह्यात येत आहे. या दौऱ्याकरिता राज्य शासन आणि प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे.

रास्ता रोको आंदोलन

एकीकडे काँग्रेस काळात जिल्ह्यात शिक्षणाची गंगा वाहू लागली. मात्र भाजपच्या काळात विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत होते. यामुळे संतप्त गावकरी, विद्यार्थी आणि अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सुभाषनगर येते रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, तालुध्यक्ष डॉ. निसार (पप्पू) हकीम, सह शेकडोच्या संख्येने विद्यार्थी, पालक, महिला आणि काँग्रेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

अहेरीचे तहसीलदार फारुख शेख, पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, आगार व्यवस्थापक जितेंद्र राजवैद्य यांनी आंदोलस्थळी भेट दिली. आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. सोमवारपासून नियमित बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. सोमवारपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत तात्पुरता आंदोलन मागे घेण्यात आले.

'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.