ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा, चिकने व्हा, मग जिला पटवायचे तिला… शिंदे सरकारच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे.रोज मासे खा. ऐश्वर्या राय सारखे तुमचे डोळे होती. चिकने दिसाल. मग जिला पटवायचे तिला पटवा, असा अजब सल्ला गावित यांनी दिला आहे.

ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा, चिकने व्हा, मग जिला पटवायचे तिला... शिंदे सरकारच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान
aishwarya rai Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 10:04 AM

धुळे | 21 ऑगस्ट 2023 : शिंदे सरकारमधील मंत्री, आमदार रोज काही ना काही कारणाने चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्यांना धमकावण्यावरून तर कधी पत्रकारांना शिवीगाळ करण्यावरून हे नेते चर्चेत असतात. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आमदारांना कसं मंत्रीपद मिळालं याचा गौप्यस्फोट करून शिंदे सरकारला अडचणीत टाकलं. तर आता आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांनी वादग्रस्त विधान करून वादाला फोडणी दिली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय ही मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे. तुम्हीही मासे खाऊन डोळे सुंदर करा. म्हणजे जिला पटवायचे तिला पटवता येईल, असं वादग्रस्त आणि धक्कादायक विधान विजय कुमार गावित यांनी केलं आहे.

धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आदिवासी विकास मंत्री, डॉ. विजय कुमार गावित यांनी हे विधान केलं. त्यावेळी मंचावर डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. दररोज मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रॉयचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील. जिला पटवायचे तिला पटवूनच घ्याल, असे वादग्रस्त विधान विजयकुमार गावित यांनी केले आहे. थेट मंत्र्यानेच हे विधान केल्याने उपस्थितांच्या भुवयाच उंचावल्या.

हे सुद्धा वाचा

त्वचाही सुंदर होईल

ऐश्वर्या राय ही बंगळुरू जवळ समुद्रकिनारी असलेल्या शहरात राहायची. ती दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत. तुम्ही मासे खाल्ले तर तुमचे डोळे ऐश्वर्याप्रमाणे सुंदर होतील. त्वचा सुधारेल, असेही ते गावित म्हणाले.

चिकने दिसायला लागतात

मासे खाल्ल्यावर दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर माणूस… माणूस म्हणजे बाई आणि माणूस चिकने दिसायला लागतात. आणि डोळे तरतरीत दिसतात. कुणीही बघितली तरी पटवूनच घ्या. तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना… ती दररोज मासे खायची. बघितले ना तिची डोळे. तसे तुमचे बी होऊन जाणार.. माश्यांमध्ये ऑईल असतं. त्यामुळे डोळ्यावर परिणाम होतो. त्यामुळे स्कीन चांगली राहते, असंही ते म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.