Parbhani Murder : परभणीत अज्ञात कारणावरुन वृद्ध दाम्पत्याची हत्या, एक महिला गंभीर जखमी

सकाळी शेजाऱ्यांनी शंकरराव रिक्षे उठले नाहीत म्हणून पाहिले असता शंकरराव आणि सरजाबाई रिक्षे हे दोघे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. तर गिरजाबाई आडकिने या गंभीर अवस्थेत बाजूला दिसल्या. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली. ताडकलस पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Parbhani Murder : परभणीत अज्ञात कारणावरुन वृद्ध दाम्पत्याची हत्या, एक महिला गंभीर जखमी
ढाक्यात इस्कॉनच्या मंदिरावर हल्लाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 8:32 PM

परभणी : अज्ञात कारणावरुन एका वृद्ध दाम्पत्याची गळा चिरुन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना परभणीतील असोला येथे उघडकीस आली आहे. तर अन्य एका वृद्ध महिलेवरही जीवघेणा हल्ला (Attack) करण्यात आला असून यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शंकर रिक्षे (70), सरजाबाई रिक्षे (60) अशी मयत वृद्ध दाम्पत्यांची नावे आहेत. तर गिरजाबाई आडकीने असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेची ताडकलस पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले. (Elderly couple murdered in Parbhani for unknown reasons)

दाम्पत्याची गळा चिरुन हत्या

असोला येथील शंकरराव ग्‍यानोजी रिक्षे आणि त्यांची पत्नी सरजाबाई शंकरराव रिक्षे हे दोघे रात्री जेवण करून झोपले होते. त्यांच्या सोबत त्यांची मेहुणी गिरजाबाई गोविंद आडकिने याही मुक्कामी होत्या. शिवाय आडकिने यांच्यासोबत एक अज्ञात तरुण मुक्कामी होता. सकाळी शेजाऱ्यांनी शंकरराव रिक्षे उठले नाहीत म्हणून पाहिले असता शंकरराव आणि सरजाबाई रिक्षे हे दोघे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. तर गिरजाबाई आडकिने या गंभीर अवस्थेत बाजूला दिसल्या. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली. ताडकलस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी गिरजाबाई आडकिने यांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले.

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक पाचारण करत ठसे तपासणीचे काम सुरू केले आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस तपासात काय निष्पन्न होते हे पाहणे महत्वाचे आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हत्या नेमकी कुणी केली ? आणि कोणत्या कारणासाठी केली ? हे पोलिस तपासानंतरच उघड होईल. (Elderly couple murdered in Parbhani for unknown reasons)

इतर बातम्या

Buldhana Murder : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, आरोपी पत्नीसह प्रियकर अटकेत

Pune crime| पुण्यात शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ ; पीडित गायब मुलगी सापडली चित्रा वाघ यांची माहिती

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.