नेवासा येथील वीजेची समस्या सुटणार, धनगरवाडी आणि घोगरगावात प्रत्येकी 33KV उपकेंद्रांना मंजुरी
नेवासा तालुक्यातील धनगरवाडी आणि घोगरगाव या दोन ठिकाणी प्रत्येकी 33 के. व्ही. उपकेंद्र प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील धनगरवाडी आणि घोगरगाव या दोन ठिकाणी प्रत्येकी 33 के. व्ही. उपकेंद्र प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. विज प्रश्नासंदर्भात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आणि उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सदर निर्णय घेण्यात आला. (Electricity problem in Nevasa to be solved, 33 KV substations approved in Dhangarwadi and Ghogargaon)
धनगरवाडी येथे नवीन 33/11 उपकेंद्र एसीएफमध्ये तरतूद करण्यात आली आहे. याकरिता 348.18 लाख रुपये इतक्या निधीची तरतूद केलेली आहे. घोगरगाव ता. श्रीरामपूर हे उपकेंद्र कृषी धोरण 2020 या योजनेमध्ये मंजूर करण्यात आले असून याकरिता 437.78 लाख रूपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याने या उपकेंद्रामुळे नागरिकांची वीजेची समस्या कायमची दूर होणार असल्याचे गडाख यांनी सांगितले. काही दिवसांत उपकेंद्राच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
धनगरवाडी आणि घोगरवाडी या दोन ठिकाणी प्रत्येकी ३३ के. व्ही. उपकेंद्र प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. काही दिवसांत उपकेंद्राच्या कामाला सुरुवात होणार आहे. या उपकेंद्रमुळे नागरिकांची वीज समस्या कायमची दूर होणार आहे. pic.twitter.com/GWt5qivbM2
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) September 9, 2021
नेवासा तालुक्यातील प्रत्येक गावात उपलब्ध एसीएफच्या निधीतून उर्वरीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. या बैठकीस महावितरणचे प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) प्रवीण परदेशी, अधीक्षक अभियंता सुनील काकडे, नगर ग्रामीणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत काकडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वीज प्रश्नासंदर्भात मृद व जलसंधारण मंत्री @GadakhShankarao यांच्या अध्यक्षतेखाली आणि ऊर्जा राज्यमंत्री @prajaktdada यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत नेवासा तालुक्यातील धनगरवाडी व घोगरगाव या दोन ठिकाणी प्रत्येकी ३३ के.व्ही. क्षमतेच्या उपकेंद्र प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. pic.twitter.com/hGp46dX3Gq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 9, 2021
इतर बातम्या
(Electricity problem in Nevasa to be solved, 33 KV substations approved in Dhangarwadi and Ghogargaon)