या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही नाचण्याचा मोह आवरला नाही; वैशाली सामंतच्या गाण्यावर धरला ठेका
स्टेजवर गाणं सुरू असताना प्रेक्षकांमध्ये झिंग झिंग झिंगाट गाण्यावर प्रेक्षक थिरकत होते. त्यांच्यासोबत अमिता चव्हाण याही थिरकताना दिसल्या. तसेच त्यांच्या दोन्ही मुलींना प्रेक्षकांसोबत गाण्यावर ठेका धरला.
नांदेड : नांदेडमध्ये दिवंगत कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित संगीत सोहळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना नाचण्याचा मोह आवरला नाही. एरव्ही कडक शिस्तीत वावरणाऱ्या म्हणून अमिताताई नांदेडकरांना परिचित आहेत. मात्र त्यांचा हा मनमोकळा अवतार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. अमिताताई सोबतच माजी मंत्री डीपी सावंत यांच्यासह सगळ्या सभागृहाने देखील वैशाली सामंतच्या गाण्यावर ठेका धरला होता. अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुली देखील मनमुरादपणे नाचल्या. अमिताताई चव्हाण यांनी पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता.
गाण्यावर प्रेक्षकांचा प्रतिसाद
कुसुमताई चव्हाण स्मृतिप्रीत्यर्थ कुसुम महोत्सवाचं आयोजन एक ते तीन मार्चदरम्यान यशवंतराव महाविद्यालय प्रांगणात करण्यात आले. अमिताताई या माजी आमदार आहेत. या कार्यक्रमाच्या त्या संयोजिका आहेत. वैशाली सामंत गाण गात आहेत. या गाण्यावर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमिता चव्हाण यादेखील स्टेजवर थिरकताना दिसतात. शिवाय प्रेक्षकांचा उत्साह वाढवताना दिसतात. या संगीत कार्यक्रमाचा प्रेक्षकांनीही मनमुराद आनंद घेतला.
सांस्कृतिक मेजवाणी
स्टेजवर गाणं सुरू असताना प्रेक्षकांमध्ये झिंग झिंग झिंगाट गाण्यावर प्रेक्षक थिरकत होते. त्यांच्यासोबत अमिता चव्हाण याही थिरकताना दिसल्या. तसेच त्यांच्या दोन्ही मुलींना प्रेक्षकांसोबत गाण्यावर ठेका धरला. या संगीत कार्यक्रमामुळे नांदेडकरांची चांगलीच सांस्कृतिक मेजवाणी झाली. एक-दोन नव्हे तर चार-पाच गाण्यांवर अमिताताई थिरकताना दिसल्या. त्यामुळे प्रेक्षकाही त्यांच्या जागेवर राहून थिरकत होती.