अकोल्यात IB ची बनावट टोळी सक्रिय, Shiv Sena आमदाराच्या घरावर धाड

अकोला : शिवसेना आमदाराच्या घरावर बनावट IB अधिकाऱ्यांनी धाड टाकली. बनावट अधिकारी आयबीची कागदपत्रे दाखवा म्हणाले. हे बनावट अधिकारी असल्याचं बाजोरिया यांच्या लक्षात आलं. बाजोरिया कुटुंबीयांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये बनावट IB अधिकाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली. बनावट IB अधिकारी प्रतीक गावंडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

अकोल्यात IB ची बनावट टोळी सक्रिय, Shiv Sena आमदाराच्या घरावर धाड
अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 5:09 PM

अकोला : राजकीय नेत्यांच्या घरी सध्या ईडीच्या धाडीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे कोणत्या नेत्याच्या घरी ईडीचे धाड पडेल हे सांगता येत नाही. अशातच अकोल्यातील एका माजी आमदाराच्या बंगल्यात एक व्यक्ती कार घेवून आली. आपण आयबीकडून (IB) आलो असल्याचे सांगितलं. या व्यक्तीने वाहनांची व घराच्या कागदपत्रांची माहिती मागण्यास सुरुवात केली. मात्र हा व्यक्ती बनावट अधिकारी असल्याचे लक्षातच येताच या प्रकरणी खदान पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (MLA Gopikishan Bajoria) यांचा बंगला आहे. याच बंगल्यात एक कार अचानकपणे पहिल्या माळ्यावरील पार्कींगमध्ये थेट आत गेली. कारचा क्रमांक एमएच 04 एफयू 0919 आहे. याच कारमधून एक व्यक्ती उतरून थेट माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया यांचे बंगल्याचे समोरील बाकावर जावून बसतो. त्याला पाहून यश अश्विनकुमार बाजोरिया (Yash Ashwinkumar Bajoria) यांना संशय येतो.

गाड्यांची कागदपत्र, चाव्या मागितल्या

त्यानंतर यश आणि त्यांचे काका संजय बाजोरीया व सुनील बाजोरीया त्याच्या जवळ जातात. त्याची विचारपूस करतात. त्यावर तो आपण आयबीचा माणूस आहे असे सांगून सर्व गाड्यांची कागदपत्रे तसेच चाव्या मागतो. मात्र त्याच वेळी येथे उपस्थित असलेले आमदार बाजोरिया यांच्या नातवासोबत वाद घालण्यास सुरुवात करतो. दरम्यान दमदाटी करून तो व्यक्ती दोन गाड्यांची चावीही घेतो. त्यानंतर घराचे कागदपत्र मागू लागतो. त्याचा संशय आल्याने यश आणि त्यांचे काका त्याला ओळखपत्र मागतात. मात्र सदर व्यक्ती ओळखपत्र देण्यास नकार देतो. त्या व्यक्तीवरील संशय अधिक वाढल्याने दरम्यान त्या व्यक्तीचे नाव प्रतीक संजयकुमार गावंडे असे समजताच. तरीही हा व्यक्ती घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागतो. हा सगळा प्रकार अकोल्यातील माजी आमदार बाजोरिया यांच्या घरी घडला आहे.

खदान पोलिसांत गुन्हा दाखल

दरम्यान त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने जबरदस्ती करत शिवीगाळ केली. पाहून घेतो, अशी धमकी दिली. तो बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला बंगल्याबाहेर काढून खदान पोलिसात तक्रार दिली. यश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रतीक संजयकुमार गावंडे याच्याविरुद्ध भांदविचे कलम 452, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या आरोपी प्रतीक संजयकुमार गावंडे याला वाहनांवर असलेल्या फॅन्सी व युनिक नंबरचे फोटो काढण्याचा छंद असल्याची माहिती आहे. त्यामुळे तो वेगवेगळ्या वाहनांचे छायाचित्र काढण्यासाठी बंगल्यात जातो. माजी आमदार बाजोरिया यांच्या बंगल्यातही तो यासाठीच गेला असावा, अशी माहिती आहे.

Photo : नागपुरात Devendra Fadnavis यांनी उभारली गुढी, मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी दिल्या शुभेच्छा

Nagpur Election | प्रशासकीय राजवटीमुळं माजी नगरसेवकांच्या अडचणीत वाढ, निवडणूक खर्च वाढणार

Akola water | लोहारा येथे पाण्यासाठी मारामारी, पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे, विहिरींमध्ये ठणठणाट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.