Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amol Mitkari : आणखी काही व्हिडीओ व्हायरल होण्याची भीती, अमोल मिटकरी यांची सायबर सेलकडे तक्रार!

मिटकरींनी थेट अकोल्याच्या सायबर सेलला माझ्यासंदर्भात व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आणि इतर व्हिडीओ व्हायरल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Amol Mitkari : आणखी काही व्हिडीओ व्हायरल होण्याची भीती, अमोल मिटकरी यांची सायबर सेलकडे तक्रार!
मिटकरी यांनी का घेतली सायबर सेलकडे धाव? Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 5:51 PM

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमधील व्हिडीओ वायरल करण्यात आला. आणखी तीन-चार वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) सायबर सेलला (Cyber Cell) तक्रार केली.आमदार अमोल मिटकरी आणि अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Youth Congress) जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांचा वादाला खळबळजनक वळण लागलंय. त्यांच्यातील वाद आता हा अकोल्याच्या सायबर सेल पोलिसांपर्यंत पोहचला आहे. अमोल मिटकरींनी थेट सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिटकरींची सायबर सेलकडे धाव

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी काही दिवसांपूर्वी मूर्तिजापूर येथे झालेल्या बैठकीचा व्हिडीओ वायरल केला. या प्रकरणी आणि इतर व्हिडीओ व्हायरल होण्याची शक्यता आहे. या कारणाने मिटकरींनी सायबर सेलला दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या संदर्भात मिटकरींवर आरोप करणारे शिवा मोहोड यांना सायबरकडून बोलावणं म्हणजे हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवा मोहोड यांच्याकडे कोणते पुरावे आहेत. त्यामुळं आमदारांना पोलीस ठाणे गाठावे लागले.

मिटकरींचा शिवा मोहोड यांना इशारा

अकोल्यात राष्ट्रवादी पक्षात पदाधिकारी आणि आमदाराकडून एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राष्ट्रवादीचे शिवा मोहोड़ यांनी थेट मिटकरी हे कामासाठी कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता. यासोबतच मिटकरींना थेट त्या महिला पदाधिकाऱ्याचं काय प्रकरण आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मिटकरींनी आरोप फेटाळत शिवा मोहोडांना सूचक इशारा दिला होता.

हे सुद्धा वाचा

कोणते व्हिडीओ व्हायरल होण्याची भीती

सध्या राज्यभरात हा विषय चांगलाचं रंगला. आता मिटकरी आणि मोहोड यांच्यातील वादाला आता नवीन वळण आलं. मिटकरींनी थेट अकोल्याच्या सायबर सेलला माझ्यासंदर्भात व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आणि इतर व्हिडीओ व्हायरल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

शिवा मोहोड मंगळवारी सायबर सेलमध्ये हजर होणार

या तक्रारीनंतर सायबर सेलचे प्रमुख राहुल वाघ यांनी शिवा मोहोड यांना फोनवरुन सायबर सेल इथे हजर होण्याच्या सूचना दिल्या. आमदार साहेबांनी आपल्या विरोधात व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार दिली. आपण हजर व्हावे असे सांगण्यात आले आहे. आता मोहोड मंगळवारी सायबर सेलला हजर होणार असल्याची माहिती आहे.

तक्रार आली, चौकशी सुरू

मात्र आमदार मिटकरी संदर्भात कोणते व्हिडिओ व्हायरल झाले. अन् कोणते व्हिडीओ व्हायरल होणार आहे. हे मंगळवारी स्पष्ट होईल. पोलिसांना या संदर्भात विचारले असता त्यांनी आपल्याकडे तक्रार आलेली आहे. चौकशी सुरू असल्याचं सांगितलं आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.