Chandrapur Accident : घरी परतणारी महिला पोलीस कर्मचारी अपघातात ठार, रस्त्यावरील अतिक्रमणाचा बळी, मिनीट्रकची दुचाकीला धडक

राजुरा तहसील कार्यालय मार्गावर नेहमी वर्दळ असते. या वर्दळीमुळं वाहन चालविताना अडचण होते. रस्ता कसा शोधावा हेच कळत नाही. दुचाकी जात होते. मागून आलेला मिनीट्रकही वेगात होता. त्यामुळं एक महिला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी गेला. आता तरी पोलीस कर्मचारी या रस्त्यावरील अतिक्रमण हटवतील का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Chandrapur Accident : घरी परतणारी महिला पोलीस कर्मचारी अपघातात ठार, रस्त्यावरील अतिक्रमणाचा बळी, मिनीट्रकची दुचाकीला धडक
घरी परतणारी महिला पोलीस कर्मचारी अपघातात ठारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 9:38 AM

चंद्रपूर : मिनिट्रकच्या धडकेत (Minitruck hit) दुचाकीस्वार महिला पोलीस कर्मचारी (female police officer) जागीच ठार झाली. मोनल बनकर (Monal Bankar) असे मृतक महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. बल्लारपूर पोलीस ठाण्यातील ड्युटी आटोपून आपले राहते घरी राजुरा येथे मोनल परत जात होत्या. राजुरा तहसील कार्यालय मार्गावर वर्दळीच्या भागात आयशर ट्रकने मागून धडक दिली. रस्त्यावर अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुकीमुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे. मोनल या बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. राजुरा येथे त्यांचं राहणं होतं. त्या बल्लारपूरवरून राजुल्याला घरी परत जात होत्या. घरी जाण्याची लगबग होती. घरी कोणती कामं करायची याची त्यांना आस लागली असेल. पण, घरी जाण्यापूर्वीत अपघातात त्यांचा जीव गेला.

असा झाला अपघात

राजूरा तहसील कार्यालय हा वर्दळीचा भाग आहे. याठिकाणी नेहमी गर्दी असते. आयशर ट्रकने मोनल यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. ही धडक इतकी मोठी होती की, मोनल यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचेही नुकसान झाले. गाडी चक्काचूर झाली. तसेच मोनल यांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेशिस्त वाहतुकीचा बळी

राजुरा तहसील कार्यालय मार्गावर नेहमी वर्दळ असते. या वर्दळीमुळं वाहन चालविताना अडचण होते. रस्ता कसा शोधावा हेच कळत नाही. दुचाकी जात होते. मागून आलेला मिनीट्रकही वेगात होता. त्यामुळं एक महिला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी गेला. आता तरी पोलीस कर्मचारी या रस्त्यावरील अतिक्रमण हटवतील का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

हे सुद्धा वाचा

वाहतूक पोलीस करतात काय

रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जाते. पण, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळंच रस्त्यावर वर्दळ वाढली. याचा परिणाम लोकांना त्रास होऊ लागला. कालतर महिला पोलीस कर्मचाऱ्याचाच बळी गेला. दुचाकी अडवूण कागदपत्र तपासणारे पोलीस आता तरी जागे होणार का, वाहतूक सुरळीत करणार का, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.