VIDEO : अहमदनगरमध्ये सरफेस कोटिंग ऑइल कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती असून काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. कंपनीला आग लागल्याची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

VIDEO : अहमदनगरमध्ये सरफेस कोटिंग ऑइल कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
अहमदनगरमध्ये सरफेस कोटिंग ऑइल कंपनीला भीषण आगImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 6:42 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील दत्तनगर एमआयडीसी परिसरातील सरफेस कोटिंग (Surface Coating) ऑईल कंपनीला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण आग (Fire) लागली. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइलचा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरात धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले होते. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर, लोणी, राहाता, अशोक नगर भागातील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केले. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत फोमचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे.

शार्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती असून काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. कंपनीला आग लागल्याची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून राज्यांमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्याने आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

इतर बातम्या

अल्पवयीन गतीमंद मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला बेड्या

दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये पुन्हा कारवाई; पिस्तुल, काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.